अब्दुल सत्तार

भारतीय राजनीतिज्ञ

अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे एक भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या विभागांचे राज्यमंत्री आहेत. २००९-१४ मध्ये ते महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारमध्ये पशुसंवर्धन खात्याचे राज्य मंत्री होते. २०१९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झाले. ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत.[ संदर्भ हवा ]

अब्दुल सत्तार

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००९
मतदारसंघ सिल्लोड

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०१९ पर्यंत)
शिवसेना (२०१९ पासून)
निवास सिल्लोड, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय समाजकारण व राजकारण

संदर्भसंपादन करा