अपस्मार (अवतार)

स्मृतिभ्रंश घडवणारा एक असुर
अपस्मार , नटराजांच्या पायाशी दडपलेला आहे (नटराज = शिवांचा एक अवतार ).

वर्णनसंपादन करा

हिंदू पौराणिक कथांनुसार, आपस्मारा हा एक खुजा, बुटका असूर आहे जो आध्यात्मिक अज्ञान आणि निरर्थक वाक्प्रयोगासाठी (बडबडीसाठी) ह्या वैशिष्ट्यांकरता ओळखला जातो. त्याला दक्षिण भारतात 'मुयालका' किंवा 'मुयलकान' म्हणूनही ओळखले जाते. पुराणांनुसार जगात ज्ञान टिकवण्यासाठी आपसमुराला पराभूत केले पाहिजे, मारले जाऊ नये कारण असे केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि अज्ञान यांच्यात आवश्यक संतुलन बिघडू शकते. अपस्माराचे जर समूळ निर्मूलन केले तर ज्ञानार्जनासाठी आवश्यक प्रयत्न, समर्पण आणि परिश्रम न करता साधकाला ज्ञानाची प्राप्ती होईल आणि यामुळे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे अवमूल्यन होईल.

नटराजांचा अवतार संपादन करा

अपस्माराला दडपण्यासाठी, श्रीमहादेवाच्या श्रीनटराज हा अवतार धारण केला. अपस्माराला रूप बदलण्याच्या शक्ती प्राप्त होत्या, त्यांचा वापर करून तो एखाद्याचा स्मृतिभ्रंश (सद्सद्विवेकबुद्धीचा) घडवून आणत असे, जणू एक प्रकारे स्वतःचं रूप बदलण्यात तो उत्तम नट बनला होता. आदिशक्ती पार्वती मातेचा स्मृतिभ्रंश घडवून आणला परिणामतः त्यांच्या मूळ स्वरूपाच्या अनुपस्थितीत जगाचा समतोल बिघडू लागला. अशा संकटकाळी श्रीनटराजांनी वैश्विक तांडव नृत्य केले. या नृत्यादरम्यान, श्रीनटराजांनी आपल्या उजव्या पायाने अपस्माराला चिरडून दडपले. अमरत्व मिळालेल्या काही राक्षसांपैकी एक म्हणून, अपस्मारला मानले जाते म्हणूनच श्री शिव अपस्माराला दडपण्यासाठी अनंतकाळापर्यंत सदैव नटराज रूपात विराजित राहतात[१]

नटराजांचा उजवा पाय अपस्माराच्या पाठीवर आहे हा अपस्मार लोभीपणाचे आणि स्वार्थाचे जिवंत उदाहरण आहे. त्याला पराभूत करण्यासाठी त्याच्या पाठीवर उभे राहून, त्याला निष्क्रिय करणे हाच उपाय आहे! श्री नटराज हेच करत आहेत. त्यांनी त्यांच्या उजव्या पायाखाली हा धूर्त असुर चिरडून ठेवला आहे. परंतु लक्षात घ्या की श्री नटराज अपस्मार चिरडलेल्या पायाकडे, आपले लक्ष वेधत नाहीत, तर जो डावा पाय त्यांनी आता भूमीपासून वर उचललेला आहे त्याकडे आपलं हात दाखवून आपलं लक्ष वेधतात. कारण उचललेला पाय, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरोधी दिशेत आहेत ऐहिक बंधनापासून मोक्ष, मुक्तीचे प्रतीक आहे. [२]