अनुषंगिक परिणाम
वैद्यकशास्त्रात, इच्छित परिणाम साधण्यासोबत झालेला दुय्यम उपचारात्मक वा प्रतिकूल परिणाम म्हणजे अनुषंगिक परिणाम होय. प्रत्यक्षात ही संज्ञा मात्र मुख्यत्वे प्रतिकूल परिणामांसाठीच वापरली जाते. अनुषंगिक परिणाम हा औषधामुळे झालेला अवांछित पण लाभदायक परिणामही असू शकतो.
प्रसंगवश, अनुषंगिक परिणामांसाठीच औषधे घेण्यास सांगितले जाते किंवा प्रक्रिया केल्या जातात; अशा प्रसंगी कथित अनुषंगिक परिणाम हा अनुषंगिक न राहता वांछित परिणाम होतो. उदाहरणार्थ, क्ष-किरणांचा ऐतिहासिक काळापासून वापर प्रतिमाननसाठी केला जातो आहे. त्यांची कर्कनाशी क्षमता सिद्ध झाल्यावर किरणोपचारात त्यांचा वापर होऊ लागला.