अनुराधा कोइराला (एप्रिल १४, इ.स. १९४९ - हयात) या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वेश्याव्यवसायात अडकलेल्या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या माइती नेपाळ या संघटनेच्या त्या संस्थापिका व संचालिका आहेत.

अनुराधा कोइराला
Anuradha.jpg
अनुराधा कोइराला
जन्म: एप्रिल १४, इ.स. १९४९
संघटना: माइती नेपाळ
धर्म: हिंदू
पती: दिनेश प्रसाद कोइराला (घटस्फोटित)

सध्या या संस्थेतर्फे काठमांडू शहरात पुनर्वसन केंद्र चालवले जाते. तसेच, भारत-नेपाळ सीमेवर तात्पुरती निवास केंद्रे व काठमांडू शहरात अकादमी चालवली जाते. माइती ही संस्था नावाला अनुसरून (नेपाळी भाषेत माइती म्हणजे माहेर) भारतातील कुंटणखान्यांतून सुटका झालेल्या स्त्रियांना आसरा देते. अशा स्त्रिया त्यांची कुटुंबे त्यांना पुन्हा स्वीकारेपर्यंत अथवा स्वतःच्या पायांवर उभ्या राहीपर्यंत माइतीने पुरविलेल्या निवासस्थानांत राहू शकतात.

सुटका केलेल्या स्त्रियांची त्यांच्या कुटुंबांशी पुन्हा गाठ घालून देणे, भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांबरोबरीने गस्त घालणे व इतर संबंधित कायदेशीर बाबी हाताळणे तसेच, वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या स्त्रियांची भारतातील अधिकाऱ्यांच्या मदतीने सुटका करणे, ही कामेही माइती नेपाळ करते.

कोइराला यांना ऑगस्ट २५, इ.स. २००६मध्ये शेर्बर्न, मॅसॅच्युसेट्स येथील द पीस अ‍ॅबेकडून 'द करेज ऑफ कॉन्सायन्स' पुरस्कार मिळाला, तसेच इ.स. २०१०साली 'सीएनएन हिरो ऑफ द ईयर' पुरस्कार मिळाला.

अमेरिकन सरकारने या संस्थेला पाच लाख अमेरिकन डॉलरांची, दोन वर्षांची आर्थिक मदत एप्रिल, इ.स. २०१०मध्ये देऊ केली आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.