अनिल तानाजी सपकाळ

मराठी साहित्यिक, प्राध्यापक, व विश्लेषक

डॉ. अनिल तानाजी सपकाळ (जन्म : १३ डिसेंबर, १९६६) हे एक मराठी नाटककार, चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक आहेत. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख आहेत. तसेच ते फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठचे समन्वयक व गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासन, मुंबई विद्यापीठ, मुंबईचे प्रभारी विभागप्रमुख आहेत.[]

व्यक्तिगत जीवन

संपादन

जन्म आणि शिक्षण

संपादन

सपकाळ यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई येथे झाला. कोरेगाव येथे ते उच्च माध्यमिक शिक्षण झाले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथे पदव्युत्तर शिक्षण व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 1996 साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. प्राप्त केली.

कारकीर्द

संपादन

सपकाळ यांनी १९९० मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी विषयात एम. ए.ची पदवी घेतल्यानंतर “मराठी चित्रपटाची पटकथा: एक चिकित्सक अभ्यास” हा प्रबंध सादर करून १९९६ मध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९६ व १९९७ मध्ये अनुक्रमे नेट व सेट परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांनी विविध विषयात साहित्य निर्मिती केली, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात संशोधन प्रकल्प राबवले व शोधनिबंध सादर केले. त्याचे हे कार्य शासनातर्फे तसेच विविध संस्थांमार्फत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या शैक्षणिक योगदानासोबतच सोबतच त्यांनी दृकश्राव्य माध्यमांमध्ये भरीव योगदान दिलेले आहे.

संशोधन प्रकल्प

संपादन

दीर्घ मुदतीचा संशोधन प्रकल्प

संपादन

‘दलित नाटक : संहिता, प्रयोग आणि कलातत्त्वे’ या विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मंजूर दीर्घ मुदतीचा संशोधन प्रकल्प पूर्ण (१ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २००७).

लघु मुदतीचा संशोधन प्रकल्प

संपादन

‘मराठी कादंबऱ्यांचे चित्रपटरूप’ पुणे विद्यापीठाच्या बी.सी.यु.डी. संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत संशोधन पूर्ण (जानेवारी, २००७ ते डिसेंबर २००८)

प्रकाशित ग्रंथ आंतरराष्ट्रीय प्रकाशन

संपादन
  1. छत्रपती शाहू महाराज (शालेय विद्यार्थ्यांसाठी चरित्र), (रयत शिक्षण संस्था, मॅकमिलन इंडिया, या प्रकाशन संस्थेसाठी) २००३. ISBN 1403-909628

प्रकाशित ग्रंथ[]

संपादन
  1. समीक्षा: दुसरी खेप, प्रथमावृत्ती २०१२, प्रकाशक – सायन पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे. ISBN 978-93-81351-15-4
  2. मराठी चित्रपटाची पटकथा, प्रथमावृत्ती २००५, द्वितीयावृत्ती २०१२. प्रकाशक-अनुबंध प्रकाशन, ISBN 978-81-86144-50-1[]
  3. समीक्षा:पहिली खेप प्रथमावृत्ती | २००८ द्वितीयावृत्ती | २०१४ सायन पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे ISBN 978-93-81351-12-3[]
  4. पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर (कथा संग्रह), प्रकाशक-सुगावा प्रकाशन, २००४. ISBN 81-88764-16-7
  5. भडास (कादंबरी) प्रथमावृत्ती | २०००, द्वितीयावृत्ती | २०१४ सायन पब्लिकेशन्स प्रा. लि., पुणे. ISBN 978-93-81351-26-0[]
  6. नाटकः आकलन आणि आस्वाद, (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या तृतीय वर्ष बी. ए.च्या अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक) २००२. ISBN 81-7171-889-2
  7. हवा आहे तरी कशी (मुलांसाठी विज्ञान कथा), प्रकाशक-अनुबंध प्रकाशन, १९९०.
  8. पारंब्या (काव्यसंग्रह), प्रकाशक-भलरी प्रकाशन, १९८९

संपादित ग्रंथ

संपादन
  1. संदर्भासहित स्त्रीवाद (वैचारिक), (वंदना भागवत आणि गीताली वि. म. यांच्या सहाय्याने) शब्द प्रकाशन, मुंबई (१२ जानेवारी २०१४) . ISBN 978-93-82364-19-1[]

चित्रपट लेखन

संपादन
  1. ‘धनगरवाडा’ – समीर आठल्ये दिग्दर्शित मराठी चित्रपटाचे पटकथा, संवाद लेखन – २०१५[]
  2. ‘ढोलताशे’ – अंकुर काकतकर दिग्दर्शित मराठी चित्रपटाचे पटकथा, संवाद लेखन – २०१५[]
  3. ‘गाभारा’ - एन.एफ.डी.सी.निर्मित आणि ३७ व्या राज्य चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन, १९९९.

चित्रपट लेखन (सहाय्यक)

संपादन
  1. ‘हे गीत जीवनाचे’- कथा, पटकथा, संवाद, १९९५.

चित्रपट माध्यम: सहाय्यक व सह-दिग्दर्शन

संपादन
  1. ‘गाभारा’ १९९९
  2. ‘सुगंधा’ १९९६
  3. ‘हे गीत जीवनाचे’ १९९५
  4. ‘धरलं तर चावतंय’ १९९२

माहितीपट, दृकश्राव्यमाध्यम: संशोधन, संहितालेखन व दिग्दर्शन

संपादन
  1. माहितीपट ‘Situational Analysis Of Women Water Professional In South Asia’ भारत आणि नेपाल या देशांतील ‘जल सिंचन’ क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांवर आधारित माहितीपट (२०११)
  2. ‘हिंदोळा: वास्तव परीत्यक्तांचे’ महाराष्ट्रातील परित्यक्ता चळवळीचा इतिहास अधोरेखित करणारा माहितीपट (२००९)
  3. ‘पाउलखुणा’ पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या प्रश्नांविषयी माहितीपट (१८१८ ते २००५) २००५.
  4. ‘मृगजळ’ मराठी दूरदर्शन मालिका, मुंबई दूरदर्शन वरून प्रसारित, २०००
  5. ‘शांताबाई’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अग्रणी स्त्री कार्यकर्त्या आणि दादासाहेब गायकवाड यांच्या सहकारी शांताबाई दाणी यांच्या जीवन व कार्यावर आधारित माहितीपट (मराठी, हिंदी, इंग्रजी) २०००.
  6. ‘प्रवाह’-महाराष्ट्रातील आदिवासी समाज व संस्कृतीवर आधारित मराठी माहितीपट, मुंबई दूरदर्शन, १९९८

दृकश्राव्य माध्यम : तंत्र दिग्दर्शन

संपादन
  1. सिरातल मुस्ताकन’-हिंदी/उर्दू मालिका, ५ भागांचे दिग्दर्शन, मे, २०१२.
  2. ‘सम्राट अशोक’ या नाटकाची ध्वनीचित्रफित.
  3. ‘मेनी बॉडीज वन सोल’ – औद्योगिक विकासावर आधारित माहितीपट, १९९३
  4. ‘सक्सेस बिल्ट ऑन व्हॅल्यू’- औद्योगिक विकासावर आधारित माहितीपट, १९९३

दृकश्राव्य माध्यम : संहितालेखन

संपादन
  1. जिप्सी (ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित माहितीपट) २०१५.
  2. भाई वैद्यः एक सामाजिक पर्व, (माहितीपट)२०१४
  3. निर्णय, (लघुपट) २०१३
  4. ‘वॉटर’ पाणलोटक्षेत्र विकासावर आधारित असलेला माहितीपट २००६
  5. ‘ब्रह्मपुरीचे वैभव’– भाग १ व २, बालचित्रवाणीसाठी माहितीपट, १९९१

दृकश्राव्य माध्यम : संहितालेखन व सहदिग्दर्शन

संपादन
  1. ‘महाराष्ट्राचा शेतीविकास’– स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या शेतीचा आलेख दाखविणारा माहितीपट, भारत सरकारच्या शेती मंत्रालयासाठी, २०००
  2. ‘देशभक्त केशवराव जेधे’ – ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेधे यांच्या जीवन व कार्यावर आधारित माहितीपट, १९९९
  3. ‘वनराई बांध’ - सामाजिक वनीकरण आणि पाणलोट क्षेत्र विकासावर आधारित माहितीपट (हिंदी). १९९६
  4. ‘यशवंतराव’ - यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्यावर आधारीत माहितीपट (मराठी),१९९३
  5. ‘भूमिपुत्र यशवंतराव चव्हाण’- यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्यावर आधारित दिल्ली दूरदर्शनसाठी माहितीपट (हिंदी)१९९३
  6. ‘गाऊ त्यांना आरती’- मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित झालेली मराठी प्रायोजित मालिका, १९९२
  7. ‘चिंगी हॅज फ्युचर’– अपंग व विकलांग मुलांवर आधारित दिल्ली दूरदर्शनसाठी माहितीपट (इंग्लिश), १९९१
  8. ‘आशिश’ - दिल्ली दूरदर्शनसाठी हिंदी प्रायोजित मालिका, १९८९

दृकश्राव्य मध्यम: सहदिग्दर्शन

संपादन
  1. ‘टूवर्डस सस्टेनेबल डेव्हलपमेंट– पाणलोट क्षेत्रविकासावर आधारित माहितीपट (इंग्रजी, हिंदी, मराठी), १९९७
  2. ‘गोधन आले घरा’-पशुसंवर्धनावर आधारित माहितीपट, १९९३

विशेष योगदान

संपादन
  1. ‘मराठी चित्रपटाची पटकथा’ या ग्रंथाचा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश
  2. ‘भडास’ या कादंबरीचे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश (२०१३-१६)

सादर शोधनिबंध

संपादन

डॉ. अनिल सपकाळ यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांची यादी खाली दिली आहे.

आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

संपादन
  1. विषय     :     Pedagogy of Dalit Theatre to Understand the Dalit Movement in India
    आयोजक: Indian Society for Theatre Research and (ISTR) and Foundation for liberal and Management Education (FLAME) VIII Annual International Conference of Indian Society for Theatre Research on Indian Theatre and Pedagogy: National and International Perspective (9-11 Feb, 2012)
  2. विषय     :     Human values in Dalit Theatre through a Buddhist Perspective
    आयोजक: Sri Lanka Association of Buddhist Studies (SLABS). (4th Bi-Annual International Conference, 11-12-2011)

राष्ट्रीय चर्चासत्र

संपादन
  1. विषय : प्रेमानंद गज्वी आणि त्यांचे नाट्य लेखन
    आयोजक: ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. गुरुवार, दि. १० मार्च २०१५.
  2. विषय : महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांचे मराठी भाषाविषयीचे धोरण
    आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन भाषा संचनालय व मराठी भाषा विभाग, मुंबई दि. २१ फेब्रुवारी २०१५.
  3. विषय : Psychological Explorations of Indian Women in the Novels of Indian Women Novelists (Chairman of the session)
    आयोजक: Rajarshi Shahu Arts and Commerce College, Rukadi, held on 30th and 31st January 2015.
  4. विषय : सतीश आळेकरांची नाटके : सांस्कृतिक आकलन
    आयोजक: मराठी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. गुरुवार, दि. २९ जानेवारी २०१५.
  5. विषय : मध्ययुगीन मराठी वाङ् मय इतिहास लेखन(समारोप सत्राचे अध्यक्ष)
    आयोजक : शिवछत्रपती कला व वाणिज्य या महाविद्यालय, पुणे. दि. २० व २१ जानेवारी २०१५.
  6. विषय : कथनात्मक साहित्य आणि जमातवाद
    आयोजक :साहित्य अकादमी, मुंबई दि. २७ व २८ डिसेंबर २०१४.
  7. विषय : दलित साहित्याचा सामाजिक संदर्भ
    आयोजक : मराठी विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दि. १४ व १५ नोव्हेंबर २०१४.
  8. विषय : आंबेडकरवाद एवं भारतीय दलित साहित्य के अंतःसंबंध
    आयोजक : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ दलित स्टडीज’ जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली. सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०१४ .
  9. विषय : समकालीन दलित नाटक आणि लोककला
    आयोजक : साहित्य अकादमी, दि. १६ आणि १७ मार्च २०१३.
  10. विषयः दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
    आयोजक: मराठी विभाग, पुणे विद्यापीठ दि. ८ आणि ९ मार्च २०१३.
  11. विषय : दलित नाटकाची दृश्यात्मकता
    आयोजक : सेंटर फॉर इंग्लिश स्टडीज, जेएनयु, दिल्ली (४ ते ६ मार्च २०१३)
  12. विषय  : समकालीन दलित रंगभाषा : दिशा आणि कार्यभार
    आयोजक : झारखंडी भाषा साहित्य, संस्कृती आखडा, रांची, झारखंड. (समकालीन दलित- आदिवासी रंगभाषा : दिशा और कार्यभार २६ ते २८ मार्च २०१२)
  13. विषय  : दूरदर्शन – दृक – श्राव्यमध्यम
    आयोजक : श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर. (प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा, दि. ११-३-२०११)
  14. विषय : साठोत्तर मराठी साहित्य प्रवाह
    आयोजक : मराठी विभाग, जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालय, अलिबाग. (सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, दि. २-२-२०११).
  15. विषय  : मी आणि माझे साहित्य
    आयोजक: साहित्य अकादमी (१५० वी रवींद्रनाथ टागोर जयंती महोत्सव, दि. २३-७-२०१०).
  16. विषय : Expressions of consciousness in Dalit theatre
    आयोजक: डॉ. आंबेडकर सेंटर फॉर सोशल जस्टीस (exploring dalit consciousness 23-3-2010)
  17. विषय : दलितांच्या सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप
    आयोजक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ (दलित चळवळीचे स्वरूप दि. १४-२-२००९)
  18. विषय : दलित नाटक
    आयोजक: डॉ. घाळी कॉलेज गडहिंगलज (समकालीन मराठी साहित्य : स्वरूप आणि समीक्षा – १९७५ ते २०००, दि. ४-१-२०१०
  19. विषय : दृकश्राव्य माध्यमे आणि मराठींचा अभ्यासक्रम
    आयोजक: अभ्यासक्रम परिवर्तनाच्या दिशा) दि. २१-१-२००९
  20. विषय  : दलित व पुरोगामी रंगभूमी परस्पर संबंध
    आयोजक: आंतरविद्या शाखा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दि.८-१-२००९
  21. विषय : समकालीन दलित रंगभूमी
    आयोजक: साहित्य अकादमी आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (समकालीन भारतीय दलित साहित्य, दि. २८-११-२००८)
  22. विषय  : चित्रपट आणि जात
    आयोजक: आंतरप्रणाली अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ
  23. विषय : भारतीय दलित रंगभूमी
    आयोजक: इंग्लिश विभाग, मुंबई विद्यापीठ (Indian theatre today, दि.३०-१-२००८)
  24. विषय : ‘दलित साहित्य के अवधारणा मे रंगमंच (इंग्रजी)
    आयोजक: भारतीय उच्च अध्ययन संस्था, सिमला, दिनांक-२५-२६ सप्टेंबर २००८
  25. विषय  : ‘दलित साहित्य आणि स्त्रीवाद’
    आयोजक: ऐक्य भारती रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे दिनांक - २ फेब्रुवारी २००८
  26. विषय : Engaging with caste the cinematic and documentary in the curriculum
    आयोजक: समाजशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ (caste in curriculum: Documentary films as pedagogical tools 8-1-2008)
  27. विषय : मराठीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि दृकश्राव्य माध्यमे
    आयोजक: मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे – दि. २४-२-२००७
  28. विषय : भारतीय दलित साहित्य (बीजभाषण)
    आयोजक: कला आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालय, पेडणे, गोवा, दि. २२-३-२००५
  29. विषय : ‘दलितांचे राजकारण: सद्यस्थिती आणि भवितव्य’
    आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७ दिनांक-२५ व २६ फेब्रुवारी २००४
  30. विषय  : जयंत नारळीकर यांचे विज्ञान साहित्य (कथा आणि कादंबरी)
    आयोजक: मराठी विभाग, गोवा विद्यापीठ, गोवा (विज्ञान साहित्यः सद्यस्थिती आणि आव्हाने, चर्चासत्र) दि. १५-१६ डिसेंबर २००३

विद्यापीठस्तरीय चर्चासत्र

संपादन
  1. विषय : प्रसार माध्यमे आणि साहित्य व्यवहार
    आयोजक: दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय. (दि.२२-२-२०१२)
  2. विषय : प्रसार माध्यमे आणि साहित्य व्यवहार
    आयोजक: दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय. (दि.२२-२-२०१२)
  3. विषय : व्यवसायाभिमुख मराठी: विविध दिशा
    आयोजक: मराठी विभाग, वाघिरे महाविद्यालय, सासवड. ( दि.५-२-२०११)
  4. विषयः आधुनिक मराठी वांङमयातील विविध प्रवाह
    आयोजक: श्री साहू मंदिर महाविद्यालय, पुणे ४-२-२०११.
  5. विषय : मराठी ललित गद्याची वाटचाल
    आयोजक: मराठी विभाग, चांदमल ताराचंद बोदा महाविद्यालय,शिरूर. (२३-१२-२०१०)
  6. विषय : विद्यापीठीय मराठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि सांस्कृतिक राजकारण
    आयोजक: पेमराज सरडा महाविद्यालय, अहमदनगर. (दि. २९-३० डिसेंबर २००६)
  7. विषय : ‘शांताबाई कांबळेंचे आत्मकथन: माझ्या जन्माची चित्तरकथा’
    आयोजक: टाकळी ढोकेश्वर महाविद्यालय, जिल्हा अहमदनगर. (नेमलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास, चर्चासत्र. (३१ जानेवारी २००३)

प्रकाशित शोधनिबंध (यादी)

संपादन
  1. ‘अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांवर आधारित मराठी चित्रपट’ या विषयावर ‘लढाई परिवर्तनाची’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित. ऑगस्ट २०१५ (ISSN 987-2395-5651)
  2. ‘प्रेमानंद गज्वी यांची नाटके: एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर आकलन’ या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित. जुलै – सप्टेंबर २०१५ (ISSN 2394-2177)
  3. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या मासिकात लेख प्रकाशित. १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१४ (ISSN 2250-3145)
  4. ‘साठोत्तरी दलित नाटक : समकालीन दलित नाटक + पर्यायी संस्कृती’ या विषयावर ‘सक्षम समीक्षा’ या त्रैमासिकात लेख प्रकाशित. ऑक्टोबर – नोव्हेंबर – डिसेंबर २०१४ (ISSN 2231 4377)
  5. जाता नाही जात- परिवर्तनाचा वाटसरू, नोव्हेंबर २०१२, पान क्र. ९० ते ९६
  6. सिद्धार्थ तांबेचं जाणं अस्मितादर्श, ऑक्टोबर २०१२, पान क्र. १३० ते १३२.
  7. वि. वा. शिरवाडकरांची सामाजिक नाटके - प्रतिष्ठान, जुलै-ऑगस्ट २०१२, पान क्र. ३६ ते ४६.
  8. सिद्धार्थ तांबे यांची कविता -शिक्षक संघटक, नोव्हेंबर २०११, पान क्र. १९ ते २२.
  9. स्त्रीवाद आणि दलित साहित्य- अन्वीक्षण, जानेवारी ते मार्च २०११, पान क्र. १४ ते १८.
  10. मराठी चित्रपटांचा पटकथा आणि त्यांचा मूलाधार असणाऱ्या कादंबऱ्या, अक्षरगाथा, जानेवारी ते मार्च २०११, पान क्र. ११ ते १८.
  11. दलित नाटकांचा विस्तीर्ण अवकाश- सक्षम समीक्षा एप्रिल ते जून २०११, पान कर. १५ ते १८
  12. अनुसूचित जातींचे साहित्य नाट्यकला माध्यमांतील आग्रही स्वत्व आविष्कार- त्रैमासिक अन्वीक्षण, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१०, पान क्र. ३५ ते ४०
  13. कविता श्रमाची – काही पेच- परिवर्तनाचा वाटसरू, सप्टेंबर १६-३०, २००४.
  14. जयंत नारळीकर यांचे विज्ञान साहित्य- समाज प्रबोधन पत्रिका, जुलै –सप्टेंबर २०१४, पान १४६-१५४.
  15. दलित कविता – स्त्रीवादी वाचन- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ जानेवारी २००४, पान १३-१५
  16. या जगण्यातून (शुभा नाईक यांच्या काव्यसंग्रहावर प्रदीर्घ लेख)- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ जून २००३, पान १५-१७
  17. एक कथा वाचन – उर्मिला पवारांची ‘कवच’- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ जून २००३, पान ३०- ३९

राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशन/ संपादित ग्रंथातील लेख

संपादन
  1. योगिराज वाघमारे यांच्या प्रयोगशील एकांकिका, (सम्यक लेखक योगिराज वाघमारे, संपादक -सारीपुत्र तुपेरे), एक्स्प्रेस पब्लिकेशन, कोल्हापूर, २०१२. ISBN 978-81-924883-0-1/
  2. चित्रपट माध्यम, (चौकटीबाहेरच जग खंड १, संपा. महावीर जोंधळे, तुकाराम रोंगटे), चेतक बुक्स प्रकाशन, पुणे. ११ जून २०११. ISBN 978-81-920413-3-9
  3. चरित्र नायक आणि आत्मकथनकार यांच्यातील सांस्कृतिक टकराव, (उत्तम कांबळे यांची आत्मकथने : चर्चा आणि चिकित्सा, संपादक - शैलेश त्रिभुवन), डायमंड पब्लिकेशन्स, पुणे. २०१०. ISBN 978-81-8483-3-5-3-9
  4. आमचा बाप आन आम्ही: एक कथन परंपरा, (आमचा बाप आन आम्ही: स्वरूप आणि समीक्षा, संपा.शैलेश त्रिभुवन), ग्रंथाली प्रकाशन, प्रथम आवृत्ती, जाणे २००८.
  5. ‘पांढरा उंदीर’, (गावकुसाबाहेरील कथा, संपादक - शरणकुमार लिंबाळे), दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.१५ जून २००७
  6. समाज प्रबोधनातून विचार पोहोचविणारी दलित रंगभूमी, (जातक, दत्ता भगत गौरव ग्रंथातील लेख, संपादक: प्रल्हाद लुलेकर) कैलाश पब्लिकेशन्स, औरंगाबाद, पहिली आवृत्ती, जुलै २००५
  7. जयंत नारळीकर यांचे विज्ञान साहित्य, (मराठी विज्ञान साहित्य, संपादक - डॉ. म.सु .पगारे), प्रशांत पब्लिकेशन्स, जळगांव, प्रथम आवृत्ती, ऑगस्ट २००४.
  8. पाटलाच्या लंडनवारीतील ‘स्व’, (पाटलाची लंडनवारी: काही दृष्टीक्षेप, संपादक – प्रा. शैलेश त्रिभुवन), सुविधा प्रकाशन, पुणे, १ जानेवारी २००८. ISBN 81-86152-55-5
  9. दळवींच्या नाटकांची तौलनिक चिकित्सा, (बहुआयामी : जयवंत दळवी, संपादक - डॉ. म.सु. पगारे), प्रशांत पब्लिकेशन्स, जळगांव, ऑगस्ट २००३.
  10. मराठी नाटक व चित्रपटातील संत चोखोबाची प्रतिमा, (संत चोखामेळा: विविध दर्शन, संपादक -– डॉ. एलिनॉर झेलियट आणि वा.ल. मंजुळ), सुगावा प्रकाशन, पुणे, डिसेंबर २००२. ISBN 81-96182-93-4
  11. बाबुराव बागुल आणि दलित साहित्य, (समग्र लेखक: बाबुराव बागुल, संपादक - – डॉ. कृष्ण किरवले), प्रतिमा प्रकाशन, पुणे, नोव्हेंबर २००२. ISBN 81-7774-046-6
  12. सिनेमातला चोखोबा- परिवर्तनाचा वाटसरू, १६ ते ३० जून २००२, पान १९-२९
  13. प्रतिमांच्या गराड्यात चोखोबा- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ मे २००२, पान १६-१७
  14. म. भि. चिटणीसांचा चोखोबा- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ जून २००२, पान १२
  15. सावकारांचा चोखोबा- परिवर्तनाचा वाटसरू, १६ ते ३१ मे २००२, पान १३-१४, १७
  16. स्त्रीवाद आणि दलित साहित्य- महाराष्ट्र साहित्य पत्रिका क्र. ३००, जानेवारी-मार्च २००२, पान ५५-५८
  17. ‘उजळल्या दिशा’ दलित राजकारणाची नवी दिशा- परिवर्तनाचा वाटसरू, १ ते १५ ऑगस्ट २००१, पान ६-९
  18. मन्वंतर (दीनानाथ मनोहर यांच्या कादंबरीवरील लेख)- संवादिनी, २००१, पान ४४-४७.
  19. बाबुराव बागुल आणि दलित साहित्य- समाज प्रबोधन पत्रिका/ ऑक्टोबर-डिसेंबर २०००, पान २१३-२१८

विविध संपादित ग्रंथातील संशोधन लेख

संपादन
  1. Representations of Chokhamela in Marathi film and drama[]
    Edited by, Eleanot Zelliot, Rohini Mokashi-Punekar, Manohar Publishers and Distributors, New Delhi, 2005, 175-184. SBN-81-7304-644-2.
  2. ‘पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर’ या कथा संग्रहातील कथांचे ‘वसुधा’ आणि ‘युद्धरत आम आदमी’ या नियत कालीकांमध्ये हिंदीतून अनुवाद प्रकाशित. जुलै-सप्टेंबर २००३.

लेखन प्रकाशित लेख (यादी)

संपादन
  1. ‘दलित रंगभूमीविषयी एलकुंचवार यांच्याशी संवाद’ ही मुलाखत ‘नवाक्षर दर्शन’ या अंकात प्रकाशित. वर्ष ८ अंक चार (महेश एलकुंचवार विशेषांक) (ISSN 2319-6467)
  2. ‘हयाती’ या गुजराती मासिकाच्या ‘मराठी दलित साहित्य विशेषांका’त सप्टेंबर २०१४ (ISSN : 2231-0282) आणि ‘मराठी दलित कविता’ या पुस्तकात ‘बाजार’ ही कविता प्रकाशित.
  3. सम्यकः सर्वसमावेशक साहित्य संमेलन, ललित, जानेवारी २०११.
  4. ‘आबांच जाणं’ (भी. शी. शिंदे यांच्यावरील लेख), लोकसत्ता, १८ फेब्रुवारी २०१०.
  5. रयतेचा पुरोगामी राजा बहुजन महाराष्ट्र, ६ मे २००९.
  6. समाज प्रबोधनातून विचार पोहचवणारी दलित रंगभूमी’, दैनिक प्रभात, १६ जानेवारी २००५.
  7. आंबेडकर चळवळचा संदर्भग्रंथ (शतकातील क्रांती: महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, लेखक – राजा जाधव) रविवार सकाळ, दि.२३ नोव्हेंबर २००३.

प्रकाशित स्तंभलेखन

संपादन
  1. चित्रपट (मराठी आणि हिंदी चित्रपट विषयक), मासिक सत्याग्रही विचारधारा, जानेवारी १९९३ ते सप्टेंबर १९९३.
  2. नेहले पे देहला (सामाजिक – सांस्कृतिक) पाक्षिक परिवर्तनाचा वाटसरू, जानेवारी २००२ ते सप्टेंबर २००२.

प्रकाशित मुलाखती

संपादन
  1. गिरीश कर्नाड यांची मुलाखत, सृजन वार्षिक अंक २०११, पान क्र.४५ ते ५३.
  2. प्रा.सादी जाफिर यांची मुलाखत, पुरुष उवाच, दिवाळी अंक २०११, पान क्र. १७२ ते १७४
  3. दलित रंगभूमीची वाट- दत्ता भगत यांची मुलाखत, वाटसरू, १६ ते ३१ मे २०११, पान क्र. ४३.
  4. दलित रंगभूमीची वाट - भि. शि. शिंदे यांची मुलाखत, वाटसरू, १६ ते ३१ मे २०११, पान क्र. ३४
  5. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांची मुलाखत, वसा, दिवाळी अंक २००९, पान क्र. ६ ते १७
  6. जागतिकीकरण आणि कला संस्कृती: गो. पु. देशपांडे यांची मुलाखत, सृजन, दिवाळी अंक २००८, पान क्र. ७ ते १०.

सामाजिक उपक्रम

संपादन

1) निमंत्रक, फर्स्ट सम्यक शॉर्ट फिल्म ॲण्ड डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हल, पुणे मे २०१४. 2) निमंत्रक, सम्यक साहित्य संमेलन, पुणे २०१३ 3) निमंत्रक, सम्यक साहित्य संमेलन,पुणे २०१२ 4) निमंत्रक, सम्यक साहित्य संमेलन, २०११ 5) निमंत्रक, सम्यक साहित्य संमेलन, दि.११,१२,१३ एप्रिल २०१० 6) संयोजक, ‘अभिसरण आणि दलित चळवळ’ परिसंवाद. दि. २८ डिसेंबर २००२ 7) संयोजक समिती सदस्य, आंबेडकरी विचारवंतांची राज्यव्यापी परिषद, पुणे. दि. २५ ते २६ डिसेंबर १९९९ 8) संयोजक, ‘तरकश’ (बाणांचा भाता) दि. जावेद अख्तर यांच्या कवितांचा कार्यक्रम, दि. १३ फेब्रुवारी १९९७ 9) संयोजन समिती सदस्य, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर स्मृती महोत्सव, पुणे.दि. १ ऑगस्ट १९९४ ते २९ ऑगस्ट १९९४ 10) संयोजन समिती अध्यक्ष, दलित एकांकिका कार्यशाळा, पुणे. दि. २३ व २४ जून १९९४

पुरस्कार/ पारितोषिक

संपादन

१) यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचा अंजनाबाई इंगळे तिगावकर यांचा ‘संदर्भासहित स्त्रीवाद’ या संपादित ग्रंथास स्त्रीवादी साहित्य पुरस्कार प्राप्त. जानेवारी २०१५ २) साहीर लुधियानवी आणि बलराज सहानी फाऊंडेशनचा ‘पटकथा लेखक के. ए. अब्बास’ पुरस्कार प्राप्त. ऑक्टोबर २०१४. ३) ‘समीक्षा : पहिली खेप’ या समीक्षा ग्रंथास वांग्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांचा पुरस्कार २००९. ४) ‘भडास’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र अनुवाद परिषद आणि ‘तुका म्हणे’ या लघु अनियतकालिकाच्या वतीने ‘तुका म्हणे’ पुरस्कार, २००३. ५) ‘शांताबाई’ या माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती. या माहितीपटाचे फिल्मस् डिव्हिजन, फोर्ड फौंडेशन आणि सुरभी यांनी आयोजित केलेल्या ‘अलंकार’ या महोत्सवात सादरीकरण, २००३. ६) एन.एफ.डी.सी.निर्मित आणि ३७ व्या राज्य चित्रपट महोत्सवांत प्रथम पारितोषिक विजेत्या ‘गाभारा’ या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखन, २०००. ७) ज्ञानपीठ तर्फे १९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘भारतीय कविताएॅं– १९८९-१९९१’ या पुस्तकात ‘पारंब्या’ या काव्यसंग्रहातील कवितेचा समावेश. ८) ‘भलरी’ दिवाळी अंकाच्या संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या उत्कृष्ठ दिवाळी अंकाचा पुरस्कार, १९९३.


  1. ^ http://mu.ac.in/portal/faculties/arts/languages-linguistics-literaure/department-of-marathi/
  2. ^ "anil sapkal - Google Scholar Citations". scholar.google.co.in. 2019-04-03 रोजी पाहिले.
  3. ^ Sapkal, Anil (2017). Marathi Chitrapatachi Patkatha (Marathi भाषेत) (2017 edition ed.). Anubandha Prakashan.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: extra text (link)
  4. ^ "Samiksha : Pahili Khep". www.bookganga.com. 2019-04-03 रोजी पाहिले.
  5. ^ Sapkal, Anil (2015). Bhadas (2011 edition ed.). Generic.CS1 maint: extra text (link)
  6. ^ "स्त्रीच्या दु:खाचा शोध घेणाऱ्या समाजव्यवस्थेची मीमांसा". Loksatta. 2019-04-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Dhangarwada (2015) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 2019-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-04-03 रोजी पाहिले.
  8. ^ Editorial, M. M. W. "Dhol Taashe ( ढोल ताशे )" (इंग्रजी भाषेत). 2019-04-03 रोजी पाहिले.
  9. ^ Zelliot, Eleanor; Mokashi-Punekar, Rohini (2005). Untouchable Saints: An Indian Phenomenon (इंग्रजी भाषेत). Manohar. ISBN 9788173046445.