Anikspray (en); अनिक स्प्रे (mr) skimmed milk powder and dairy product brand in India (en); skimmed milk powder and dairy product brand in India (en) Anik Spray (en)

अनिकस्प्रे किंवा अनिक स्प्रे ही लिप्टन इंडियाने विकसित केलेली आणि सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्किम्ड मिल्क पावडर ब्रँडपैकी एक आहे. हा ब्रँड आजही लोकप्रिय आहे. तथापि, १९९१ नंतरच्या उदारीकरणानंतरच्या काळात झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे त्याचा बाजारातील वाटा मोठ्या प्रमाणात कमी झाला. ही दुधाची पावडर ताज्या दुधापासून बनवल्यामुळे पाण्याच्या संपर्कात येताच त्यात पटकन मिसळण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच यात गुठळ्या होत नाहीत. यामुळे ही भारतीय स्वयंपाकघरात लोकप्रिय झाली आणि ताज्या दुधाला पर्याया म्हणून दुधाचा चहा बनवण्यासाठी वापरली जाऊ लागली. [१] [२]

अनिक स्प्रे 
skimmed milk powder and dairy product brand in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इतिहास संपादन

ऐन भरभराटीच्या काळात, अनिक स्प्रे हा ब्रँड लिप्टन इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने मिळून विकसित केला होता. [२] [३] [४] १९९९ मध्ये, हिंदुस्तान युनिलिव्हरने आपले दुग्धजन्य पदार्थ, अनिक, अनिकस्प्रे आणि अनिक घी, हे ब्रँड न्यूट्रीशिया (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला विकले. या कंपनीची मालकी नुमिको नावाच्या डच कंपनीकडे होती. [३] [५] २००३ मध्ये न्युमिकोने भारतात आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आणि मिराज इम्पेक्सच्या नेतृत्वात असलेल्या चार कंपन्यांच्या समूहाला न्यूट्रीशिया कंपनी विकली. [६] [७] मिराज इम्पेक्सशी संबंधित कराराचा आराखडा अशोक फडणीस यांनी केला होता. ते दुग्ध व्यवसायात दिग्गज होते आणि पूर्वी मध्य प्रदेश डेअरी फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक होते. [६] [८]

संदर्भ संपादन

  1. ^ "Anik spray: skimmed milk powder". www.anikgroup.com. Anik Industries Ltd. Archived from the original on 1 January 2018. 27 December 2017 रोजी पाहिले.
  2. ^ a b Sengupta, Subroto (2005). Brand Positioning: Strategies for Competitive Advantage (इंग्रजी भाषेत). Tata McGraw-Hill Education. ISBN 9780070581593. 27 December 2017 रोजी पाहिले.
  3. ^ a b Goswami, Nandini (25 June 1999). "Nutricia to ride Lever's sales network for 3 years". Financial Express. Indian Express group. Archived from the original on 16 December 2018. 27 December 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Business World (इंग्रजी भाषेत). Ananda Bazar Patrika Limited. April 1992.
  5. ^ Chatterjee, Purvita (27 August 2001). "Nutricia foray into baby cereal -- Plans to extend franchise of Anik brand". www.thehindubusinessline.com. 27 December 2017 रोजी पाहिले.
  6. ^ a b Zachariah, Reeba (November 3, 2003). "Nutricia to exit India". www.rediff.com. 27 December 2017 रोजी पाहिले.
  7. ^ Jagersma, Pieter Klaas (2004). Internationale bedrijfskunde: van exporteren naar globaliseren (डच भाषेत). Pearson Education. ISBN 9789043008532.
  8. ^ "Hindustan Lever set to divest dairy wing to Nutricia India". Financial Express. 21 May 1999. Archived from the original on 16 December 2018. 27 December 2017 रोजी पाहिले.