विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत. अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा.

’विधर्म’

संपादन

धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो ’विधर्म’ होय.

’परधर्म’

संपादन

आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म ’परधर्म’ होय.

’उपधर्म’ किंवा ’उपमा’

संपादन

पाखंड किंवा दंभ म्हणजे ’उपधर्म’ किंवा ’उपमा’ होय.

’छ्ल’

संपादन

शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा ’छ्ल’ होय.

’आभास’

संपादन

आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो ’आभास’ होय.

संदर्भ :

श्रीमद् भागवत महापुराण स्कंध-७ वा-अध्याय १५ वा श्लोक १२-१४)