अणुकेंद्रीय व आणवीय परिबले

अणुकेंद्रीय व आणवीय परिबले ही चार प्रकारची एखाद्या अक्षाभोवती वस्तू फिरविण्याची प्रेरणेची क्षमता आहे.

ही संज्ञा मुख्यतः पुढील चार गोष्टींच्या संदर्भात वापरतात. (१) परिवलन परिबल, (२) चुंबकीय द्विध्रुवी परिबल (μ), (३) चतुर्ध्रुवी परिबल, (४) इतर चुंबकीय वा विद्युत् अनेकध्रुवी परिबले. यातील फक्त पहिल्या तीनांचा परिणाम प्रायोगिकरीत्या मोजता येतो.

परिवलन परिबलाचा परिणाम म्हणून कणांना अंगभूत चुंबकीय द्विध्रुव परिबल (μ) प्राप्त होते. अशा प्रकारे अणुकेंद्रीय व आणवीय चुंबकीय परिबले उत्पन्न होतात.

याशिवाय अणुकेंद्रीय विद्युत् भाराच्या असममित विनिमयामुळे अणुकेंद्राला व अणूला चतुर्ध्रुवी किंवा अनेकध्रुवी परिबले प्राप्त होतात. दोन विरुद्ध चिन्हांचे परंतु सममूल्य विद्युत् भार एकमेकांपासून काही अंतरावर ठेवले असता विद्युत् द्विध्रुव तयार झाला, असे म्हणतात. असे सम परिबल असलेले द्विध्रुवांचे मध्यबिंदू एकमेकांपासून काही अंतरावर असून त्यांच्या परिबलाच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतील, तर त्या रचनेस विद्युत चतुर्ध्रुव असे म्हणतात. याचप्रमाणे दोन चतुर्ध्रुवांपासून एक अष्टध्रुव, दोन अष्टध्रुवांपासून एक षोडशध्रुव वगैरे बहुध्रुव बनू शकतात. याच तत्वावर चुंबकीय चतुर्ध्रुव व इतर बहुध्रुवांची रचना असते.

संदर्भ संपादन

[१]

  1. ^ गोडबोले, रा. द. "अणुकेंद्रीय व आणवीय परिबले". मराठी विश्वकोश. खंड १. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.