मुख्य मेनू उघडा

अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Азербайджанская Советская Социалистическая Республика; अझरबैजानी: Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अझरबैजानने शरणागती पत्कारली व अझरबैजानला सोव्हियेत संघामध्ये विलिन करण्यात आले.

अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Азербайджанская Советская Социалистическая Республика
Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы

Flag of Azerbaijan.svg १९२०१९९१ Flag of Azerbaijan.svg
Flag of the Azerbaijan Soviet Socialist Republic (1956–1991).svgध्वज Emblem of the Azerbaijan SSR.svgचिन्ह
Soviet Union - Azerbaijan SSR.svg
राजधानी बाकू
अधिकृत भाषा अझरबैजानी, रशियन
क्षेत्रफळ ८६,६०० चौरस किमी
लोकसंख्या ७०,३७,९००
–घनता ८१.३ प्रती चौरस किमी

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत अझरबैजानचे अझरबैजान देशामध्ये रुपांतर झाले.

संदर्भसंपादन करा