छत्तीसगढ राज्यातील विलासपूर जिल्ह्यात बिलासपूर ते अमरकंटक रस्त्यावर असलेले अचानकमार अभयारण्य सुमारे ५५० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरले असून, १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. अचानकमार अभयारण्य हे कान्हा राष्ट्रीय उद्यानाशी कान्हा-अचानकमार नावाच्या टेकड्यांच्या रांगांनी जोडलेले आहे.

अचानकमार अभयारण्य हे विलासपूर शहरापासून ५५ कि. मी. अंतरावर आहे आणि नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले अमरकंटकही येथून जवळच आहे.

या अभयारण्यात बांबू, साल, साजा, बिजा ही मुख्य झाडे आणि वाघ, बिबट्या, रानगवा हे मुख्य प्राणी आढळतात.

चित्रदालनसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवेसंपादन करा