अखंड हरिनाम सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.
रामजन्म अर्थात रामनवमी, हनुमान जन्मोत्सव , नागपंचमी, कृष्ण जन्म अर्थात कृष्णष्टमी व गोपाळकाला, दीपावली या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अनेक राज्यात सात दिवसाचे हे नाम सप्ताह करण्याची परंपरा जोपासली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक अखंड नाम सप्ताह हा पंढरपूर, आळंदी, देहू सारख्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याचबरोबर गावोगावी निमित्ताने देखील अखंड हरिनाम करता येतात.
या काळात पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी १० वा. संत तुकाराम गाथा भजन /कुठे भगवद्गीता/ ज्ञानेश्वरी पारायण /मंचेरी वाचन करण्यात येतात. सुपारी महिला भजन,दुपारी प्रवचन, सांयकाळी हरिपाठ तर सांयकाळी ७ ते ९ अथवा ९ ते ११ या वेळेत कीर्तन केले जाते. यावेळी भगवद धर्माचे आचरण करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शेवटच्या दिवशी ग्रंथ -पालखी मिरवणूक काढली जाते. यावेळी विविध देखील टाळ मृदूंगाच्या तालावर पावल्या तर महिला भाविक फुगड्या खेळात आनंदोत्सव साजरा करतात. सकाळी अथवा सांयकाळी काल्याचे कीर्तन केले जाते यावेळी भगवान श्रीकृष्णच्या विविध लीलांचे वर्णन करण्यात येऊन दही-लाह्यांच्या प्रसाद वाटप करून भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येते.
इतिहास
संपादनकार्यक्रम
संपादनपद्धती
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |