अंश पंडित ( २९ सप्टेंबर १९९९ - उत्तर प्रदेश, भारत) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अलिगड, राजाकुमारा, धडक, दोस्ती के साइड इफेक्ट्स आणि गिन्नी वेड्स सनी या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे[]. सन २०१५ मध्ये त्याला सिने पुरस्काराकडून सर्वोत्कृष्ट बाल पदार्पण पुरस्कार देण्यात आले.[]

मागील जीवन आणि शिक्षण

संपादन

अंश याचा जन्म २९ सप्टेंबर १९९९ रोजी उत्तर प्रदेश येथे झाला. त्याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, दिल्ली येथून पूर्ण केले. दिल्लीत अनेक नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून त्यानी भूमिका साकारल्या.

चित्रपट कारकीर्द

संपादन

२०१५ मध्ये अलिगड या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते जिथे त्यानी हिमेशची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी त्याला सर्वोत्कृष्ट बाल पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. २०१७ मध्ये तोराजाकुमारा नावाच्या कन्नड चित्रपटात दिसला होता. पुढच्या वर्षी २०१८ मध्ये त्यानी शशांक खेतान दिग्दर्शित धडक या चित्रपटात काम केले जिथे त्यानी प्रीतमची भूमिका साकारली होती. वर्ष २०१९-२०२० मध्ये त्यानी दोस्ती के साइड इफेक्ट आणि गिन्नी वेड्स सनी हे चित्रपट केले.[]

चित्रपट

संपादन
चित्रपट भूमिका वर्ष
अलिगड हिमेश २०१५
राजाकुमारा श्रेयस २०१७
धडक प्रीतम २०१८
दोस्ती के साइड इफेक्ट्स २०१९
गिन्नी वेड्स सनी राज २०२०

पुरस्कार

संपादन

सिने पुरस्कारचा सर्वोत्कृष्ट बाल पदार्पण कलाकार (२०१९)

बाह्य दुवे

संपादन

अंश पंडित आयएमडीबीवर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Actor Ansh Pandit calls Sushant Singh Rajput an achiever from a small town". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2020-11-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Ansh Pandit alias Pranav Kumar from Gaziabaad is all set for a web series". mid-day (इंग्रजी भाषेत). 2020-10-10. 2020-11-18 रोजी पाहिले.
  3. ^ "Pyaar tune Kya new season launched with #DearLove campaign - Exchange4media". Indian Advertising Media & Marketing News – exchange4media (इंग्रजी भाषेत). 2020-11-18 रोजी पाहिले.