अंशू गुप्ता हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहेत.

शिक्षण संपादन

अंशू गुप्ता यांचे वडील उत्तर प्रदेशातील बनबसा येथे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या कार्यालयात नोकरी करत होते.काम करत होते. अंशू गुप्ता त्याच गावातल्या शारदा इंटर कॉलेजातून १९८५ साली पहिल्या वर्गात दहावी पास झाले. वडिलांची बदली झाल्याने त्यांनी पुढील शिक्षण टनकपूर गावातील राधेहर सरकारी कॉलेजातून केले. ज्युनियर कॉलेजमध्ये असल्यापासूनच अंशू गुप्ता यांच्यातील समाजसेवेची ऊर्मी लक्षात येत होती. त्यानंतर अंशू गुप्ता यांनी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून एकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स केले.

गूंजची स्थापना संपादन

देशातील गरिबांच्या व्यथा-वेदना दूर करण्यासाठी, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी समाजसेवेचा ध्यास घेऊन अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये भक्कम पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून 'गूंज' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली.

या संस्थेने इ.स. २०१५ सालापर्यंत हजारो टन टाकाऊ वस्तूंचे रूपांतर गरिबांना उपयोगी पडतील अशा गोष्टींमध्ये केले आहे. त्यांत प्रामुख्याने कपडे, घरगुती उपकरणे, आणि इतर शहरी टाकाऊ वस्तूंचा समावेश आहे.

ही संस्था भारतातील २१ राज्यांमध्ये काम करत आहे. दर वर्षी ५०० स्वयंसेवकांच्या आणि २५० सहकाऱ्यांच्या मदतीने एक हजार टन कचरा गोळा केला जातो. त्यातून गरिबांच्या गरजा भागविल्या जातात.

पुरस्कार संपादन

अंशू गुप्ता यांना २०१५ सालचा मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ http://www.loksatta.com/desh-videsh-news/sanjeev-chaturvedi-anshu-gupta-win-ramon-magsaysay-award-1127227/