अंजली अरुण सोमण (५ नोव्हेंबर, १९४७:निफाड, महाराष्ट्र) या मराठी लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, भाषविज्ञान व भाषांतरमीमांसा आणि वाङ्ममयीन पत्रव्यवहार याविषयांवर पुस्तके संपादित केली आहेत. त्यांनी लिहिलेल्या १९९५ साली “मराठी कथेची स्थितिगती” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले. “तिमिरभेद” (१९८९‌), आणि “बंदिश” (१९९४) या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, या संस्थेकडून पारितोषिके मिळाली. “देहाचिये गुंती” (२०१७) या कादंबरीसाठी त्यांना २०२० साली मालतीबाई दांडेकर पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]

अंजली सोमण
जन्म नाव अंजली सोमण
जन्म ५ नोव्हेंबर, १९४७
निफाड, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, लेखन, समीक्षा, संपादन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, समीक्षा, संपादन
विषय मराठी साहित्य, भाषाशास्त्र ,
प्रसिद्ध साहित्यकृती देहाचिये गुंती (कादंबरी)
पती अरुण सोमण
पुरस्कार मालतीबाई दांडेकर (३१/०१/२०२०)

व्यक्तिगत जीवन

संपादन

अंजली सोमण यांचा जन्म निफाड येथे १९४७ मध्ये झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण व नंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उर्फ एस.एन.डी.टी. विद्यापीठामध्ये त्यांनी मराठीतील स्त्रियांच्या कथा या विषयात पी.एचडी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एस.एन.डी.टी. मध्ये पदवी-पदव्युत्तर वर्गांना अध्यापन केले.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

संपादन

[]कादंबरी

  • बंदिश (१९९४)[]
  • खोल खोल डोहाच्या तळाशी (२००५)[]
  • देहाचिया गुंती (२०१७)[]
  • आकाश उजळताना (२०२०)[]

समीक्षा:

  • साहित्य आणि सामाजिक संदर्भ (१९८९‌)[]
  • मराठी कथेची स्थितिगती (१९९५)[]

भाषाविज्ञान

  • भाषाविज्ञान: वर्णनात्मक आणि ऐतिहासिक (१९८२, १९८७, २००५) – सहकार्याने[]
  • वर्णनात्मक भाषाविज्ञान – स्वरूप आणि पद्धती (१९८२) – सहकार्याने
  • Learning Marathi Through English, with Dr. Kalyan Kale (१९८६, २०१४) – अमराठी भाषकांसाठी मराठीचा अ‍भ्यास[]
  • भाषाविज्ञान परिचय (१९८७)‌ - सहकार्याने[]
  • भाषांतरमीमांसा (१९९७‌, २०१४) - सहकार्याने[१०]
  • आधुनिक भाषाविज्ञान (संरचनावादी, सामान्य, आणि सामाजिक) (१९९९)

संपादन

  • विस्तारलेलं क्षितिज (१९७९, १९९४) – स्त्रियांच्या निवडक कथा
  • तिमिरभेद (१९८९) – अंधश्रद्धा निर्मूलनविषयक लेख[११]
  • एका स्नेहबंधाची गोष्ट (२००५) – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यामधील पत्रव्यवहार.[१२]
  • एक संपादक – एक लेखिका ( २००९) – किर्लोस्कर मासिकाचे संपादक शंकरराव किर्लोस्कर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यातील पत्रव्यवहार.[१३]
  • सर्वमंगल क्षिप्राबद्दल (२०१६‌) – ह. वि. मोटे यांच्या ‘एक सर्वमंगल क्षिप्रा’ या आत्मचरित्रावरील पत्रांचे संपादन[१४]

स्वतंत्र

  • चीन: वेगळ्या झरोख्यातून (२०१९) – चीनचा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अभ्यास

गौरव व पुरस्कार

संपादन
  • “तिमिरभेद”साठी- पुण्याच्या महाराष्ट्र सहित्य परिषदेचे लक्षवेधी ग्रंथासाठीचे पारितोषिक – (१९८९)[ संदर्भ हवा ]
  • “बंदिश” (१९९४) ला पुण्याच्या महाराष्ट्र सहित्य परिषदेचे उत्कृष्ट कादंबरीसाठीचे पारितोषिक.[ संदर्भ हवा ]
  • “मराठी कथेची स्थितिगती” या पुस्तकाला राज्य शासनाचे समीक्षा पारितोषिक (१९९५)[ संदर्भ हवा ]
  • “देहाचिये गुंती” (२०१७) या कादंबरीसाठी २०२० साली मालतीबाई दांडेकर पुरस्कार
  • "आकाश उजळताना" या कादंबरीस उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पुण्याच्या महाराष्ट्र सहित्य परिषदेचे वा. म. जोशी पारितोषिक – (२०२०)[ संदर्भ हवा ]

अ‍न्य

संपादन
  • ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाच्या संपादन समितीत काम.[ संदर्भ हवा ]
  • ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या सह-संपादक आणि सल्लागार.[ संदर्भ हवा ]
  • मराठी अभ्यास परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, लिंन्ग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्त्री अभ्यास केंद्र या संस्ठांचे आजीव सदस्यत्व.[ संदर्भ हवा ]
  • जयप्रकाश नारायण विद्यालय, खेड- अहमदनगर या शाळेची विश्वस्त सदस्य.[ संदर्भ हवा ]
  • हुजुरपागा प्रशाला, पुणे – सर्वसाधारण सभासद
  • स्त्री-मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संबंध.[ संदर्भ हवा ]
  • ‘युक्रांद’ या युवा संघटनेची कार्यकारिणी सदस्य.[ संदर्भ हवा ]
  • वॉटर कलर पेंटिंग

संदर्भसूची

संपादन
  • तिमिरभेद- परीक्षण
    • शंकर सारडा, “अनेक आघाड्यांवर चालणारा लढा”, साप्ताहिक सकाळ, २२ जुलै, १९८९
    • डॉ. दत्तात्रेय पुंडे, “सामाजिकद्रृष्ट्या उपयुक्त ग्रंथ”, तरुण भारत, १२ नोव्हेंबर, १९८९
    • जयंत वष्ट, “एक चिकित्सक अभ्यास”, तरुण भारत, ३ डिसेंबर, १९८९
    • अंजली सोमण, “अंधश्रद्धांचे निर्मूलन अजूनही नाहीच”, केसरी, २९ जानेवारी, १९८९ (पुस्तकाच्या प्रस्तावनेचा गोषवारा)
  • साहित्य आणि सामाजिक संदर्भ – परीक्षण
    • प्रा. यशवंत सुमंत, “साहित्याचा व्यापक सामाजिक अंगाने सखोल विचार”, लोकसत्ता, १० जून, १९९०.
    • प्रा. रा. ग. जाधव, “रोखठोक विचार आणि कडवा कृतप्रत्यय”, केसरी, १० जून, १९९०
    • कमलेश, “बदलत्या सामाजिक संदर्भांचा अचूक वेध”, सकाळ, १० जून, १९९०.
    • गो. म. कुलकर्णी, डॉ. गो. पु. देशपांडे, कवी नारायण सुर्वे: “पुस्तक प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केलेली मते”, सकाळ, १३ जून, १९९
  • मराठी कथेची स्थितिगती- परीक्षण
    • प्रा. रा. ग. जाधव, “कथालेखक, अभ्यासकांसाठी महत्त्वाचे”, सकाळ, ३ मार्च, १९९६
    • शिल्पा घाटे, “एक अभिनव अभ्यास”, लोकमत, २६ मे, १९९६
  • बंदिश – परीक्षण
    • आशा मुंडले, “बंदिश”, स्त्री, ऑगस्ट, १९९५
    • डॉ. दत्तात्रेय पुंडे, “स्त्री विचाराची नवी चाहूल”, सकाळ, ९ जून, १९९५
    • प्रतिभा गोपुजकर, “करिअरिस्ट बायकांचे वैविध्यपूर्ण चित्रण”, लोकसत्ता, १७ नोव्हेंबर, १९९६
  • भाषांतरमीमांसा- परीक्षण
    • डॉ. गीता सुभाष भागवत, “भाषांतरमीमांसा”, लोकमत, २८ जून, १९९८

संदर्भ

संपादन
  1. ^ Soman/Kale, Anjali/Kalyan. Learning Marathi Through English.
  2. ^ "बंदिश". granthalaya.org. २१ जून २०२२ रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ Soman, Dr Anjali. "Buy Khol Khol Dohachya Talashi Dr. Anjali Soman खोल खोल डोहाच्या तळाशी डॉ. अंजली सोमण". www.majesticreaders.com (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.
  4. ^ a b "ANJALI SOMAN". akshardhara.com. २१ जून २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ Soman, Anjali. साहित्य आणि सामाजिक संदर्भ. 2022-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-21 रोजी पाहिले.
  6. ^ Soman, Anjali. मराठी कथेची स्थितिगती.[permanent dead link]
  7. ^ Soman, Anjali. भाषाविज्ञान: वर्णनात्मक आणि ऐतिहासिक.
  8. ^ Soman/Kale, Anjali/Kalyan. Learning Marathi Through English.
  9. ^ Malashe/Punde/Soman, Sakharam/Dattatraya/Anjali. भाषाविज्ञान परिचय.
  10. ^ Soman/Kale, Anjali/Kalyan. भाषांतर मीमांसा.
  11. ^ Soman, Anjali. तिमिरभेद.[permanent dead link]
  12. ^ Soman, Anjali (ed.). एका स्नेहबंधाची गोष्ट. 2022-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-21 रोजी पाहिले.
  13. ^ Soman, Anjali (ed.). एक संपादक आणि एक लेखिका.
  14. ^ Soman, Anjali (ed.). सर्वमंगल क्षिप्रा.

बाह्य दुवे

संपादन