Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: विश्वकोशीय उल्लेखन्नीयता प्रश्नांकित, संदर्भहीन लिखाण

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

ॲंजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (जन्म : इ.स. १९७४) ही पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती (जन्म : इ.स. १९८४) या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या ’थिंक टॅंक’ची सभासद असलेली ॲंजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती ’मोस्ट वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्‍नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट ॲंजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता.

ॲंजेला ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सर्रास बोलल्या जाणाऱ्या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.

मूळची चंद्रपूरची असलेली ॲंजेला ही, माओवादी चळवळ।माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.

कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे लेनिनने अंमलात आणले. रशियात आणि रशियाला लागून असलेल्या देशांत साम्यवादी राज्ये अस्तित्वात आली. चीननेही थोड्या वेगळ्या स्वरूपात साम्यवादाचा स्वीकार केला. नेपाळमध्ये, उत्तर कोरियात आणि उत्तर व्हिएटनाममध्ये साम्यवादी सत्ता आल्या. भारतातही केरळ आणि पश्चिम बंगाल ही साम्यवादी राज्ये आहेत (सन २०११). मूळच्या साम्यवादात अनेक स्थित्यंतरे घडून आली. त्यांतूनच रशियन साम्यवाद, चिनी साम्यवाद, नक्षलवाद असे भेद निर्माण झाले.

मुळात पश्चिम बंगालमधून सुरू झालेला नक्षलवाद भारताच्या अनेक राज्यात पसरला. त्याला माओवादी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. ॲंजेला सोनटक्के ऊर्फ राही ऊर्फ इशाराका (इस्कारा) ऊर्फ सविता ऊर्फ कविता ऊर्फ सुनीता पाटील ऊर्फ सौ. तेलतुंबडे ही माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने तयार केलेल्या तथाकथित ’गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या’ प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे.

जामिनावर सुटकासंपादन करा

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पौड परिसरातून अटक केलेल्या नक्षलवादी ॲंजेला सोनटक्के (ॲंजेला मिलिंद तेलतुंबडे) हिला ४ मे २०१६ रोजी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. ती पाच वर्षांपासून जेलमध्ये होती. ॲंजेलासोबत पुण्यातील कबीर कला मंचच्या काही सदस्यांवर अटकेची कारवाई झाली होती.

एटीएस'ने त्यावेळी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कबीर कला मंचच्या सहा सदस्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यातील तिघांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे तर इतर तिघे जेलमध्ये आहेत.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.