अँग्लो-सॅक्सन

(अँग्लोसॅक्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंग्लो-सॅक्सन हा एक सांस्कृतिक गट होता. तो ५व्या शतकात ग्रेट ब्रिटनमध्ये वास्तव्य करत होता. ऐतिहासिकदृष्ट्या, ॲंग्लो-सॅक्सन कालखंड सुमारे ४५० ते १०६६ दरम्यानचा कालावधी आहे. यात सुरुवातीच्या स्थलांतरापासून ते नॉर्मनच्या विजयपर्यंतचा काळ येतो. सध्याच्या (आधुनिक) ब्रिटिश लोकांचे थेट वंशज ॲंग्लो-सॅक्सन आहेत. ह्यात जर्मनिक जमातीतील लोक होते. त्यांनी ग्रेट ब्रिटन बेटात महाद्वीपीय युरोपमधून स्थलांतर केले होते. त्यांचे वंशज आणि स्थानिक ब्रिटिश गटांनी ॲंग्लो-सॅक्सन संस्कृती व भाषेच्या अनेक गोष्टींचा अवलंब केला. ॲंग्लो-सॅक्सन्सने घातलेला सांस्कृतिक पाया हा आजच्या इंग्रजी कायदा प्रणालीचा पाया मानला जातो. तसेच इंग्रजी समाजाच्या अनेक पैलूंचा शिल्पकारही ॲंग्लो-सॅक्सन सांस्कृतिक गट आहे. आधुनिक इंग्रजी भाषेत अर्ध्यापेक्षा जास्त शब्दांचा भरणा हा ॲंग्लो-सॅक्सन भाषेतील शब्दांचा आहे. त्यात दररोज वापरण्यात येणाऱ्या सामान्य शब्दांचासुद्धा समावेश आहे.[१]

हे पान गॉस्पेल मधून आहे. हे संभवतः कुथबर्टच्या स्मृतीमध्ये ईडफ्रिथ ऑफ लिंडीसफॅर्ने यांनी तयार केले असावे.

संदर्भ संपादन

  1. ^ Higham, Nicholas J., and Martin J. Ryan. The Anglo-Saxon World. Yale University Press, 2013.