'वारुळ' प्रा.डॉ. विश्वनाथ शिंदे साहित्य विशेषांक

 लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी लोककलावंतांच्या लोककला, देवदेवता, सण,उत्सव यांचे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या भागातून संशोधन केले आहे. त्यांनी लोकधाटी: अवलोकन व विचार,पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य,शाहिरी वाङ्मयाच्या धारा, लोकसाहित्य मीमांसा (भाग१,व २), लावणीचे लावण्या,पोवाडा महाराष्ट्रचा, मराठी नाटक आणि रंगभूमी, मराठी ऐकीव, शोधयात्रा रंगभूमीची, लोकसाहित्य: संशोधन आणि समीक्षा,सावळजकरांचा तमाशा: इतिहास आणि वाङ्मय हे ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्याविषयीच्या ‘वारुळ’च्या(सप्टें,ऑक्टो,नोव्हें.२०१७) गौरव विशेषांकात (भाग-पहिला)१.हालमत धनगरांचे लोकदैवत-महालिंगराया- प्रा. किसान माने, २. श्री रेणुकाविषयक आख्यायिकांची चिकित्सा- डॉ. नवनाथ अंगद शिंदे, ३. वाघरी जमातीची लोकगीते- डॉ. भाऊसाहेब राठोड, ४. लोकवाणीतील खंडोबा- डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे, ५. रुखवत- प्रा. नागीण सर्वगोड, ६. माणदेशचे लोकदैवत श्री खरसुंडी सिद्धनाथ- प्रा. दत्तात्रय महादेव डांगे, ७. लोकसाहित्याच्या आधुनिक अध्यापनपद्धती- डॉ. प्रकाश दुकळे, ८. धनगरी गजनृत्य- प्रा. सागरकुमार बाबर, ९. ख्रिस्ती समाजातील लोकसाहित्याच्या पाऊलखुणा- प्रा. अविनाश भोरे,(भाग- दुसरा)१०. मार्गदर्शक ग्रंथ- प्रा. रुस्तुम अचलखांब, ११. शाहिरी अभ्यासकांना उपयुक्त ‘शाहिरी वाङ्मयाच्या धारा’- जालिंदर विभुते, १२. लोकसाहित्यमीमांसा भाग पहिला व दुसरा- डॉ. भारती रेवडकर, १३. सावळजकर घराण्याचा दस्तऐवज- विजयश्री गवळी,१४. पितृतुल्य प्रा.विश्वनाथ शिंदे- डॉ. संगीता पांडुरंग पैकेकरी, १५. एक प्रेमळ मार्गदर्शक- प्रा.डॉ.प्रभाकर रामचंद्र पवार, १६. उपेक्षित लोककलावंताचे अंतरंग शोधणारे प्रा. विश्वनाथ शिंदे- प्रा. आबासाहेब श्यामराव शिंदे,(१७. प्रा. विश्वनाथ शिंदे यांचा परिचय ) ह्या मान्यवरांनी लेखन केले आहे.
       -स.म.देशमुख