'वारुळ' डॉ. कृष्णा किरवले साहित्य विशेषांक

  दलित साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक,आणि विचारवंत प्रा.डॉ.कृष्णा किरवले यांनी दलित रंगभूमी,मराठी शाहिरी,फुले आंबेडकरी जलसे याविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. साहित्य आणि चळवळ याविषयी ठामपणे, तत्त्वनिष्ठ भूमिकेतून मांडणी केली आहे.
   त्यांच्याविषयी ‘वारूळ‘(जून,जुलै,ऑगस्ट २०१६) च्या ‘ प्रा.डॉ.कृष्णा किरवले साहित्य विशेषांका’त १.सत्यान्वेषी संशोधक आणि तत्वज्ञ- के. व्ही. सरवदे, २.डॉ.कृष्णा किरवले घ्याची दलित चळवळ आणि दलित साहित्यविषयक भूमिका- प्रा. राजेंद्र खंदारे, ३.हापूस आंबे- योगीराज वाघमारे, ४.मराठी शाहिरीला नवे परिणाम देणारा डॉ.किरवले यांचा संशोधन ग्रंथ- डॉ. सतेज दणाणे, ५.डॉ. कृष्णा किरवले यांची मुलाखत- डॉ.संजीवकुमार सोनावणे, ६.चळवळ आणि साहित्याविषयी स्पष्ट, परखड व सत्यान्वेशी भूमिका मांडणारे समीक्षक- पंडित कांबळे यांनी लेख लिहिले आहेत.
                -स.म.देशमुख