वॉल्ट व्हिटमन
वॉल्ट व्हिटमन (/ ɪhwɪtmən /; ३१ मे १८१९ - २६ मार्च १८९२) हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. ते एक मानवतावादी होते. त्यांचा काळ हा अतींद्रियवाद आणि वास्तववादाच्या या दरम्यानच्या संक्रमणाचा काळ होता. त्यांनी त्यांच्या कामांमध्ये दोन्ही दृष्टिकोनांचा समावेश केला होता. अमेरिकन कॅनॉनमधील व्हिटमन हे सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक होते, त्यांना मुक्त वचनाचे जनकही म्हणले जाते.[१] त्यांचे कार्य त्या काळात वादग्रस्त मानले जायचे, विशेषतः लिव्हस ऑफ ग्रास या काव्य संग्रहातील त्यांचे काव्य फारच वादग्रस्त मानले होते. त्यातील स्पष्ट लैंगिकतेला अश्लीलतेशी जोडून त्याला हिणवले गेले होते. व्हिटमन यांच्यावर समलैंगिकतेचा आरोप करण्यात आला होता.
वॉल्ट व्हिटमन | |
---|---|
वॉल्ट व्हिटमन, १८८७ | |
जन्म नाव | वॉल्ट व्हिटमन |
जन्म |
३१ मे, १८१९ वेस्ट हिल्स, न्यू यॉर्क, यू.एस. |
मृत्यू |
२६ मार्च, १८९२ (वय ७२) केम्देन, न्यू जर्सी, यू.एस. |
स्वाक्षरी |
व्हिटमन यांचा जन्म लॉन्ग आयलँडवरील हंटिंग्टनमध्ये झाला होता. व्हिटमन यांनी पत्रकार, शिक्षक आणि सरकारी लिपिक म्हणून काम केले होते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी कामावर जाण्यासाठी शालेय शिक्षण सोडले. लहान असताना आणि आपल्या कारकिर्दीतील बहुतेक काळ ते ब्रूकलिनमध्ये वास्तव्यास होते. व्हिटमॅन यांचा प्रमुख काव्यसंग्रह, लीव्हज ऑफ ग्रास हे सर्वप्रथम त्यांच्या स्वतःच्या पैशाने १८५५ मध्ये प्रकाशित झाले होते. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न होता. नंतर तेच एक अमेरिकन महाकाव्य मानले गेले. १८९२ मध्ये मृत्यू होईपर्यंत ते त्या काव्यसंग्रहाचा विस्तार आणि त्यात सुधारणा करत राहिले. अमेरिकन गृहयुद्धाच्या दरम्यान ते वॉशिंग्टनमध्ये डी.सी. मध्ये गेले. तेथे जखमींची काळजी घेणाऱ्या रुग्णालयात त्यांनी काम केले. त्यांच्या कविता अनेकदा तोटा आणि उपचार या दोहोंवर केंद्रित असत. त्यांच्या दोन सुप्रसिद्ध कविता, "ओ कॅप्टन! माय कॅप्टन!" आणि "व्हेन लिलाक्स लास्ट इन द डोअरार्ड ब्लूम'ड" या अब्राहम लिंकनच्या मृत्यूवर लिहिलेल्या होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांना लकवा झाल्यानंतर, ते न्यू जर्सीच्या केम्डेन येथे रहायला गेले. परंतु तेथे गेल्यावर त्यांची तब्येत अजून खराब झाली. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार सार्वजनिकरित्या करण्यात आले.[२][३]
कवितेवर व्हिटमन यांच्या शैलीचा प्रभाव कायम आहे. मेरी स्मिथ व्हिटॉल कॉस्टेलो यांनी असा युक्तिवाद केला की "वॉल्ट व्हिटमॅन यांच्या, लीव्हज ऑफ ग्रास हा काव्यसंग्रह समजल्याशिवाय आपण खरोखर अमेरिका समजू शकत नाही ..." तसेच ते म्हणतात व्हिटमन यांनी 'अद्ययावत' सभ्यता छान व्यक्त केली आहे. इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा कोणताही विद्यार्थी त्यांच्या या साहेत्याशिवाय पूर्ण करूच शकत नाही.[४] आधुनिकतावादी कवी एज्रा पाउंड यांनी व्हिटमॅनला "अमेरिकेचा कवी ... तो अमेरिका आहे" असे संबोधले आहे.[५]
जीवन आणि कार्य
संपादनसुरुवातीचे जीवन
संपादनवॉल्टर व्हिटमनचा जन्म ३१ मे १८१९ रोजी वेस्ट हिल्स, हंटिंग्टन येथील टाऊन, लाँग आयलँड, येथे झाला. त्यांचे पालक क्वेकर वॉल्टर (१७८९-१८५५) आणि लुईसा व्हॅन वेल्सर व्हाइटमॅन (१७९५ - १८७३) होते. ते नऊ मुलांपैकी दुसरे [६] होते. त्यांना वडिलांपासून वेगळे ओळखण्यासाठी "वॉल्ट" हे टोपणनाव देण्यात आले होते.[७] वॉल्टर व्हिटमन सीनियर यांनी अमेरिकन नेत्यांच्या नावावरून आपल्या सातपैकी तीन मुलांची नावे ठेवली होते: अँड्र्यू जॅक्सन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन. सर्वात थोरल्याचे नाव जेसी होते आणि दुसऱ्या मुलाचे जन्मानंतर सहा महिन्यांतच निधन झाले. या जोडप्याचा सहावा मुलगा, सर्वात धाकटा, त्याचे नाव एडवर्ड ठेवले होते.[७] वयाच्या चौथ्या वर्षी व्हिटमन आपल्या कुटूंबासह वेस्ट हिल्सहून ब्रूकलिन स्थलांतरित झाले. खराब गुंतवणूकीमुळे त्यांना येथे वेगवेगळ्या घरात रहावे लागले.[८] व्हिटमन यांना त्यांच्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे दुःखी बालपण घालवावे लागले.[९] बालपणाची एक सुखद आठवण म्हणजे ४ जुलै १८२५ रोजी ब्रूकलिनमध्ये झालेल्या उत्सवाच्या वेळी गिल्बर्ट डू मोटिएर यांनी त्यांच्या गालावर घेतलेले चुंबन होते.[१०]