३०० (चित्रपट)

२००७ मधील जैक स्निडरची अमेरिकन फिल्म

३०० हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट थर्मोपिलाईच्या लढाईवर आधारित् आहे. चित्रपटात थर्मोपिलाई येथे धारातीर्थी पडलेले ३०० सैनिक प्रचंड बहादुरीने २ लाखाहूनही मोठ्या सैन्याला तीन दिवसापर्यंत थोपवून धरतात, शेवटी एका ग्रीक नागरिकाच्या बेईमानी मुळे सर्व सैन्य शत्रूच्या कचाट्यात सापडते व माघार घेणे शक्य असतानाही स्पार्टाचे सैनिक मरण पत्करतात. ही सत्यघटना असून या चित्रपटात रंगत आणण्यासाठी बरेचसे मूळ कथेपासून कथानक बदललेले आहे.हा चित्रपट लढाईच्या दृष्यासाठी चांगलाच गाजला.

३००
दिग्दर्शन झँक स्नायडर
निर्मिती झँक स्नायडर
प्रमुख कलाकार गेरहार्ड बटलर
लेना हेडले
डेव्हिड वेनहॅम
डॉमिनिक वेस्ट
विन्सेंट रेगन
संगीत टायलर बेट्स
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश
प्रदर्शित ९ मार्च २००७
अवधी ११७ मिनिटे


पटकथा संपादन

स्पार्टाचे सैनिक हे प्राचीन ग्रीस मध्ये सर्वोतकृष्ट मानले जात. लिओनीदास हा स्पार्टाचा राजपुत्राची निवडही स्पार्टाच्या इतर सैनिकांप्रमाणे होते. लहानपणापासूनच स्पार्टाच्या सैनिकांना योद्धे म्हणून तयार करण्यात येत असे. चित्रपटाच्या सुरुवातीला समालोचक स्पार्टाच्या सैनिकांचे खडतर प्रशिक्षण सांगत असतो व एकिकडे स्पार्टाची लोकशाही रचना ग्रीसमधील इतर राज्यांशी व्यावहार यावरही चर्चा होते.

पर्शियाशी युद्धाचे वारे फिरू लागतात. झर्कसिज प्रचंड मोठी फौज घेउन ग्रीसवर आक्रमण करतो. थर्मिस्टीकलीस व लिओनिदास हे ग्रीकांचे सेनापती बनतात परंतु स्पार्टाची लोकशाही संसद स्पार्टाला युद्धाला भाग घेण्यास स्पष्ट नकार देते. दरम्यान झर्कसिजचा दूत स्पार्टामध्ये प्रवेशतो, येतानाच जिंकलेल्या राजांच्या कवट्या लिओनिदासला दाखवतो व शरण न आल्यास स्पार्टाला मोठी किंमत मोजावी लागेल लिओनिदासच्या राणीकडे बघून स्पार्टाच्या स्त्रीया पर्शियाच्या वेश्या बनतील असे सांगतो. या वर उत्तर म्हणून दूताला मारत नाही असे सांगत असतानाच लिओनिदास स्पार्टाचा व स्पार्टाच्या राणीचा अपमान केल्याचा आरोपाखाली दूताला यमसदनी पाठवून देतो.

लिओनिदास ग्रीससाठी पवित्र असलेले स्थळ डेल्फी येथे ओरॅकल कडून भविष्य ऐकायला जातो. ओरॅकल सांगते की ग्रीस सरतेशेवटी विजयी होईल परंतु स्पार्टाला आपला राजा गमवावा लागेल. लिओनिदासला आपला अंत कळतो. परंतु तरीही न डगमगता तो युद्धाला जाण्याचा निर्णय घेतो. संसदेकडून परवानगी मिळाली नसल्याने आपल्या अधिकारातील ३०० सैनिकच तेवढे घेउन थर्मोपिलाई येथील खिंडीत पोहोचतो. वाटेत अथेन्सचे सैनिकही मिळतात व ऐवढेच सैनिक कसे अशी विचारणा होते. लिओनिदास म्हणतो की अथेन्सच्या सैन्यात गवंडी,लोहार, न्वाही अश्याचाच भरणा आहे तर माझ्याकडे फक्त सैनिकच आहेत.

थर्मोपिलाईच्या खिंडीत पोहोचल्यावर स्पार्टाचे सैनिक मोर्चेबांधणी करतात. ग्रीसकडे जाणारे सर्व रस्ते बंद करतात त्यावर ते पर्शियन दूताची मुंडकी लटकवतात व खिंडीत फक्त चिंचोळी वाट ठेवतात. या खिंडीत वाट चिंचोळी असल्याने पर्शियाच्या आफाट सैन्यबळाचा काहीच उपयोग होणार नसतो. पर्शियाचा दूत येतो अतिशय मग्रुरीच्या भाषेत शरण यायला सांगतो व सैनिकांना झोडायला निघतो. परंतु सैनिक त्याचा हात तोडून परत पाठवतात. दरम्यान स्पार्टाचा तडीपार कुटुंबातील नागरिक एफियालटीस लिओनिदास कडे या युद्धात सहभागी होण्याची विनंती करतो. परंतु त्याचे कुबड असल्याने लिओनिदास एफियालटीसला सहभागी करून घेण्यास मनाई करतो. एफियालटीस अतिशय दुःखी होतो. काहीवेळातच भूकंपासारखा भास होतो. परंतु लिओनिदास जाणतो की पर्शियन सैन्याचा हा कदमताल आहे.

स्पार्टाचे सैनिक खिंडीत वाट पाहू लागतात.दोन्ही सैन्य समोरासमोर येते पर्शियाचा सरदार मागणी करतो की शस्त्रे खाली ठेवावीत. स्पार्टा उत्तर देते की इथे आहेत येउन घ्यावीत व उत्तर् म्हणून पर्शियाच्या सरदाराला दूरुनच भाला फेकून मारतात. चवताळलेले पर्शियन सैन्य चाल करून येतात. परंतु स्पार्टाचे सैनिक तो प्रचंड लोंढा थोपावून धरतात व पर्शियाचे सैनिक जरा ढिले पडल्यानंतर लिओनिदास व त्याचे सहकारी पर्शियनांची कत्तल आरंभतात. पर्शियन सैनिक स्पार्टाच्या सैनिकांच्या तुलनेत फारच कमकुवत असतात. त्यामुळे लिओनिदासचे काम सोपे होते. पहिल्या आक्रमणात पर्शियनांची संपूर्ण फळी कापली जाते. यावर पुढचे आक्रमण म्हणून दूरून बाणांचा वर्षाव करतात, स्पार्टाचे सैनिक त्यांच्या भल्यामोठ्या ढालींखाली तोही हल्ला परतावून लावतात. पुढील हल्यात घोडदळाने हल्ला होतो. हाही हल्ला मोडून काढण्यात येतो. स्पार्टाचे सैनिक कोणतेही सैनिक न जिवंत न ठेवता फक्त पर्शियाच्या सैन्याचे शिरकाण करत असतात.

दुसऱ्य दिवशी पर्शियाची सर्वोत्तम फौज ज्यांना इमोर्टल असे म्हणायचे ते आक्रमण करतात. इमोर्टल हे पर्शियाच्या सैन्यातील सर्वोत्तम सैनिक असतात. परंतु इमॉर्टल देखील स्पार्टाच्या कसलेल्या सैन्यापुढे हतबल ठरतात. व पर्शियाचे मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले जाते. पर्शियाचे सैनिक विविध क्लुप्त्या वापरतात. अग्नी गोळे, हत्ती, गेंड्यांची व्यूहरचना करतात परंतु स्पार्टाच्या सैनिकांपुढे एक चालत नाही. झर्कसिजचे सर्व डाव फोल ठरतात. स्पार्टाच्या संसदेत स्पार्टाचे मुख्य सैन्य पाठवावे की नाही यावर अजूनही चर्चा चाललेली असते.

तिसऱ्या दिवसापर्यंत स्पार्टाच्या ३०० सैनिकांनी पर्शियाचे दोन अडीच लाखाचे सैन्य अजूनही थोपवून धरलेले असते. परंतु झर्कसिजला एफियालटीसच्या रूपाने मोठा दिलासा मिळतो. लिओनिदास कडून अपमानित झालेला एफियालटीस झर्कसिजच्या गोटात पोहोचतो व त्याला पर्वतातील दुसऱ्या मार्गाबद्दल सांगतो. आनंदीत झर्कसिज लगेचच आपले सैन्य त्या खिंडीत पाठवतो व एफियालटीसला धन व स्त्रीया देउन खूष करतो. लिओनिदासला लागलीच कळते की दुसऱ्य खिंडीच्या रस्त्याने पर्शियाचे सैन्य येत आहे व आपण लगेचच घेरले जाणार व आता पर्शियन सेनेला रोखणे शक्य नाही. लगेचच अथेन्सच्या सैनिकांना मोकळे करतो व परत जायला सांगतो. आपल्या सैन्यातील एका जखमी सैनिकाला स्पार्टामध्ये परत आपला निरोप घेउन जायला सांगतो की सांग आम्ही कसे लढलो.

स्पार्टाचे सैन्य चारही बाजूने घेरले जाते.

मूळ कथेपासून फारकत/ टीका संपादन

  • थर्मोपिलाईच्या लढाईत अथेन्स थेस्पीया व स्पार्टाच्या सैन्याने भाग घेतला होता. अथेन्सने ७००० सैन्य पाठवले होते त्यांनी देखील हिररीने सहभाग घेतला होता परंतु या चित्रपटात फक्त स्पार्टा चेच सैनिक लढतात असे दाखवले आहे.
  • एफियालटीस हा स्पार्टाचा नागरिक नव्हता. तसेच तो लिओनिदासकडे विनंती करायला गेलाही नव्हता.
  • पर्शियन राजा झर्कसिज याला अतिशय विक्षिप्त रूपात चित्रित केले गेले. यावरून बरीच टीका झाली.
  • स्पार्टाच्या सैनिकांच्या उघड्या देहयष्टीचे चित्रीकरण म्हणून देखील बरीच टीका झाली.
  • युद्ध दृश्यांत अतिशय भडक हिंसेचे प्रदर्शन् केल्या गेल्याचीही चांगलीच टीका झाली.