जुलै २४
दिनांक
(२४ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०५ वा किंवा लीप वर्षात २०६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन
पंधरावे शतक संपादन
- १४८७ - नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
सोळावे शतक संपादन
- १५६७ - मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.
अठरावे शतक संपादन
- १७०१ - ऑंत्वान दिला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
एकोणिसावे शतक संपादन
- १८३२ - बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
- १८४७ - आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
- १८६६ - टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
विसावे शतक संपादन
- १९०१ - प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बँकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
- १९११ - हायराम बिंगहॅम तिसऱ्याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
- १९१५ - ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
- १९२३ - लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
- १९३१ - पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
- १९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
- १९६९ - सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
एकविसावे शतक संपादन
- २००१ - सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- २००२ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००५ - लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
- २०१४ - एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.
जन्म संपादन
- १७८६ - जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
- १८५१ - फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ.
- १८६७ - फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
- १९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
- १९४७ - झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९६४ - बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९६९ - जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.
मृत्यू संपादन
- ११२९ - शिराकावा, जपानी सम्राट.
- १८६२ - मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- १९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता.
- १९९६ - मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.
प्रतिवार्षिक पालन संपादन
- सिमोन बॉलिव्हार दिन - इक्वेडोर, व्हेनेझुएला.
- बाल दिन - व्हानुआतु.
बाह्य दुवे संपादन
- बीबीसी न्यूजवर जुलै २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै महिना