२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका

२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका ही पोर्तुगालमध्ये १९ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान पोर्तुगालसह माल्टा आणि जिब्राल्टर या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.

२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका
दिनांक १९-२२ ऑगस्ट २०२१
स्थळ पोर्तुगाल पोर्तुगाल
निकाल पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालने तिरंगी मालिका जिंकली.
संघ
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टाचा ध्वज माल्टा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
संघनायक
एडमंड पॅकार्ड बिक्रम अरोरा नज्जम शहजाद
सर्वात जास्त धावा
ख्रिस डेलानी (१५१) वरुण थमोथराम (१६२) अझहर अदनानी (२७६)
सर्वात जास्त बळी
एडमंड पॅकार्ड (४)
ॲडम ओरफिला (४)
बिलाल मुहम्मद (५)
वसीम अब्बास (५)
सिराजुल्लाह खदीम (९)

१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच पोर्तुगाल मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने अल्बेरगेरिया-ए-वेल्हा मधील गुचेरे क्रिकेट मैदान या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी या प्रकाराने खेळवली गेली. गट फेरीचे सर्व सामने खेळून झाल्यावर अव्वल स्थानावर असलेल्या संघास विजेते घोषित करण्यात आले.

पोर्तुगालने सर्व ४ सामन्यांमध्ये विजय मिळवत तिरंगी मालिका जिंकली. तर दोन विजयांसह माल्टाला उवविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जिब्राल्टरला एकही सामना जिंकता आला नाही.

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती
  पोर्तुगाल (विजयी) +३.११०
  माल्टा -०.१५९
  जिब्राल्टर -२.९५२

साखळी सामने संपादन

१९ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
माल्टा  
१४६/८ (२० षटके)
वि
  पोर्तुगाल
१४७/४ (१८.१ षटके)
झीशान खान ३९ (२१)
सिराजुल्लाह खदीम २/२८ (४ षटके)
अझहर अदनानी ४६ (४२)
बिलाल मुहम्मद १/१४ (४ षटके)
पोर्तुगाल ६ गडी राखून विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: नईम अख्तर (पो) आणि पार्थ जौनजात (पो)
सामनावीर: आमिर झैब (पोर्तुगाल)
  • नाणेफेक : पोर्तुगाल, क्षेत्ररक्षण.
  • पोर्तुगालमध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • पोर्तुगाल आणि माल्टा मधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • माल्टाने पोर्तुगालमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टाला प्रथमच पराभूत केले.
  • अझहर अदनानी, अँथनी चेम्बर्स, सिराजुल्लाह खदीम, जुनैद खान, अमनदीप सिंग, मिगुयेल स्टोमन, आमिर झैब (पो) आणि जस्टिन शाजू (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
जिब्राल्टर  
१४८/५ (२० षटके)
वि
  माल्टा
१४९/२ (१७.३ षटके)
लुईस ब्रुस ६० (५३)
वसीम अब्बास ३/२९ (४ षटके)
बिक्रम अरोरा ५९* (४९)
ॲडम ओरफिला १/२० (३ षटके)
माल्टा ८ गडी राखून विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: नईम अख्तर (पो) आणि सुनिल चंदीरमानी (जि)
सामनावीर: वसीम अब्बास (माल्टा)
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
  • जिब्राल्टर आणि माल्टा मधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जिब्राल्टरने पोर्तुगालमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जिब्राल्टरला प्रथमच पराभूत केले.
  • लुईस ब्रुस, चार्ल्स हॅरिसन, पॅट्रीक हॅचमॅन आणि जोसेफ मार्पल्स (जि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ ऑगस्ट २०२१
०९:००
धावफलक
पोर्तुगाल  
२१७/८ (२० षटके)
वि
  जिब्राल्टर
१२१/८ (२० षटके)
अझहर अदनानी १०० (५१)
एडमंड पॅकार्ड ३/३४ (४ षटके)
जेम्स फिट्झगेराल्ड २७ (२५)
जुनैद खान ३/२४ (४ षटके)
पोर्तुगाल ९६ धावांनी विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: नईम अख्तर (पो) आणि सुनिल चंदीरमानी (जि)
सामनावीर: अझहर अदनानी (पोर्तुगाल)
  • नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.

२१ ऑगस्ट २०२१
१५:००
धावफलक
माल्टा  
१९७/३ (२० षटके)
वि
  जिब्राल्टर
१९३/२ (२० षटके)
वरुण थमोथराम १०४* (५२)
केन्रॉय नेस्टर २/३२ (४ षटके)
ख्रिस डेलानी ६९* (३७)
बिलाल मुहम्मद १/२९ (४ षटके)
माल्टा ४ धावांनी विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: सुनिल चंदीरमानी (जि) आणि पार्थ जौनजात (पो)
सामनावीर: वरुण थमोथराम (माल्टा)
  • नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
  • रिचर्ड कनिंगहॅम (जि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ ऑगस्ट २०२१
०९:००
धावफलक
पोर्तुगाल  
२१८/६ (२० षटके)
वि
  जिब्राल्टर
१०८ (१८.३ षटके)
अझहर अदनानी ८१ (४५)
जेम्स फिट्झगेराल्ड २/४७ (४ षटके)
पॅट्रीक हॅचमॅन २२ (२५)
सिराजुल्लाह खदीम ३/१६ (४ षटके)
पोर्तुगाल ११० धावांनी विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: नईम अख्तर (पो) आणि पार्थ जौनजात (पो)
सामनावीर: अझहर अदनानी (पोर्तुगाल)
  • नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.

२२ ऑगस्ट २०२१
१५:००
धावफलक
माल्टा  
१३२/८ (२० षटके)
वि
  पोर्तुगाल
१३६/७ (१७.५ षटके)
वरुण थमोथराम ३६ (२७)
सिराजुल्लाह खदीम ३/२४ (४ षटके)
अझहर अदनानी ४९ (४१)
वसीम अब्बासी २/३० (३.५ षटके)
पोर्तुगाल ३ गडी राखून विजयी.
गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा
पंच: नईम अख्तर (पो) आणि पार्थ जौनजात (पो)
सामनावीर: आमिर झैब (पोर्तुगाल)
  • नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
  • राहुल भारद्वाज, अर्स्लान नसीम आणि झुल्फिकार अली शाह (पो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.