हेमंत करकरे

हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्याधिकारी होते.


हेमंत करकरे Ma-Hemant Karkare.ogg उच्चार (जुलै १, इ.स. १९५४:नागपूर - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.

हेमंत करकरे
जन्म १ जुलै इ.स. १९५४
नागपूर महाराष्ट्र
मृत्यू २६ नोव्हेंबर इ.स. २००८
मुंबई
मृत्यूचे कारण २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ई.
पेशा मुंबई पोलिस
कारकिर्दीचा काळ इ.स. १९८२ - इ.स. २००८
प्रसिद्ध कामे मालेगाव बाँबस्फोटाचा तपास
पदवी हुद्दा मुख्याधिकारी, दहशतवाद विरोध पथक
कार्यकाळ जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २००८
पूर्ववर्ती के. पी. रघुवंशी
धर्म हिंदू
जोडीदार कविता
वडील कमलाकर
आई कुमिदिनी
पुरस्कार अशोक चक्र(२००९)

नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात करकरे यांनी वीरमरण पत्करले. करकरे यांना या हौताम्याबद्दल शांततेच्या काळातील सर्वोच्च सन्मान अशोक चक्र ने २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर सन्मानित केले गेले.