हिंदासा (Hindasa) हा शब्द अरबांनी भारतातल्या (हिंद देशातल्या) आसा या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या दशमान पद्धतीतल्या अंकांसाठी वापरला. याच अंकांना इल्म हिंद (Ilm Hind)असेही नाव अरबी भाषेत आहे. इल्म हिंद याचा अर्थ हिंद देशाच्या रहिवाशांनी (हिंदूंनी) शोधलेले अंक. दशमान पद्धतीत एक ते नऊ हे अंक आणि शून्य या चिन्हांचा वापर केला जातो. अरबांना ग्रीस या देशात वापरले जाणारे अंक देखील ठाऊक होते. ग्रीक अंक अल्फा, बीटा,... इत्यादी ग्रीक अक्षरांचा वापर करून लिहले जात. मात्र, स्थानावरून अंकाची किंमत ठरण्याची संकल्पना आसा यांनाच सुचली. याउलट, ग्रीक अंक लिहताना त्याच चिन्हांचा पुनःपुन्हा वापर करून ते लिहले जात आणि त्या अंकाची किंमत त्यातल्या चिन्हांच्या किंमतींच्या बेरजेएवढे मानली जाई. यामुळे गुणाकार, भागाकारासारख्या साध्या गणिती क्रिया देखील खूप अवघड वाटायच्या. हिंदासा अंकांमुळे गणित करणे खूपच सोपे झाले.

संदर्भ संपादन

(१) शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान ४ - ७, पान ५३.