स्मार्टफोन हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. नोकिया, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी, सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी मोबाईल उत्पादक कंपन्या स्मार्टफोन बनवण्यात अग्रेसर आहेत. गूगलचा ॲन्ड्रॉइड, नोकियाचा सिंबियन, एपलचा आय.ओ.एस्, मायक्रोसॉफ्टचा विंडोज फोन ७ आणि विंडोज मोबाईल, ब्लॅकबेरीचा ब्लॅकबेरी ओ.एस्., इत्यादी आघाडीच्या कार्यप्रणाली खासकरून स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

स्मार्टफोन
एचटीसीचा एक स्मार्टफोन

हे सुद्धा पहा संपादन