सेंट फ्रांसिस धरण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील धरण होते. लॉस एंजेल्स शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेले हे धरण लॉस एंजेल्स ॲक्वाडक्ट प्रकल्पाचा भाग होते. हे धरण १९२४-२६ दरम्यान बांधले गेले होते.

१२-१३ मार्च १९२८ च्या मध्यरात्रीपूर्वी हे धरण फुटून त्यातील पाणी लॉस एंजेल्स शहरावर लोटले. या महापुरात ४३१ लोक मृत्युमुखी पडले. १९०६ च्या सान फ्रांसिस्को धरणीकंपानंतर नैसर्गिक संकटातील ही सर्वाधिक जीवितहानी आहे.