सुरुपा सेन (नोव्हेंबर २२, इ.स. १९६९:उत्तर प्रदेश, भारत ) ह्या भारतीय ओडिसी नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक असून [१] ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती सेन यांना २०१८ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२]

सुरुपा सेन
आयुष्य
जन्म २२ नोव्हेंबर १९६९
जन्म स्थान बरेली , उत्तर प्रदेश, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार

ओळख आणि कारकीर्द संपादन

श्रीमती सुरूपा सेन यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील बरेली मध्ये २२ नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. सुरूपा सेन ने केलुचरण महापात्र, प्रोतिमा गौरी, बिचित्रानंदन स्वेन, कलानिधि नारायणन आणि रतिकांत महापात्रा सहित काही गुरूंच्या सानिध्यामध्ये तिनं ओडिसा नृत्याचा प्रशिक्षण पूर्ण केलेला आहे.[३] श्रीमती सेन यांनी संगीत नाटक अकादमीने आयोजित केलेल्या नृत्य महोत्सवांसह भारत आणि परदेशात आयोजित केलेल्या अनेक प्रतिष्ठित नृत्य महोत्सवांमध्ये भरीव कामगिरी केली आहे.[४] तिने नृत्यग्राम साठी अनेक प्रॉडक्शन्सचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. आणि यूएसए[५], इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि सुदूर पूर्वेकडील देशांचा दौरा केला आहे. सध्या नृत्यग्राम, बेंगळुरू येथे कलात्मक दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहे.

जॉयस थिएटर च्या 25 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यांसह त्यांनी अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे.[६][७] जॅकल्स पिल्लो दास फेस्टिव्हल आणि एडिनबर्ग इंटरनेशनल फेस्टिवल.[८]

पुरस्कार संपादन

श्रीमती सुरूपा सेन यांना २००६ मध्ये रझा फाऊंडेशनने दिलेला उत्कृष्टता पुरस्कार, २००८ मध्ये यज्ञरमन पुरस्कार , २०११ मध्ये कृष्ण गण सभेने दिलेला नृत्य चूडामणि पुरस्कार[९] आणि २०१८ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार यासह अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत.[१०]

संदर्भ संपादन

  1. ^ "Charmed by Odissi". thehindu.com (English भाषेत). 13 October 2011. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "The General Council of the Sangeet Natak Akademi Announces Sangeet Natak Akademi Fellowships (Akademi Ratna) and Sangeet Natak Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2018". pib.gov.in (English भाषेत). 16 July 2019. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "A Question of choice". rediff.com (English भाषेत). 16 July 2019. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Twin Faces of Desire in Movement". nytimes.com (English भाषेत). 4 May 2014. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "A dance production combining the best of Odissi and Kandyan". The Times of India (English भाषेत). 25 September 2022. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "Odissi Stars at a Dance Festival in Chennai, India". nytimes.com (English भाषेत). 6 January 2015. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "The Collaborative Show 'Samhara' at the Joyce Theater". nytimes.com (English भाषेत). 21 March 2012. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "Edinburgh festival 2011: Nrityagram Dance Ensemble – review". theguardian.com (English भाषेत). 29 August 2011. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "Annual music and dance fest". thehindu.com (English भाषेत). 1 December 2011. Archived from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "सुरुपा सेन - अकादेमी पुरस्कारः ओडिसी नृत्य - surupa sen" (PDF). sangeetnayak.gov.in (English भाषेत). 20 February 2023. Archived (PDF) from the original on 20 February 2023. 20 February 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)