सुनंदा विद्यासागर महाजन

एक मराठी लेखिका


सुनंदा विद्यासागर महाजन या एक मराठी लेखिका आहेत.

महाजन यांनी पुणे विद्यापीठातून जर्मन भाषा हा विषय घेऊन एम.ए. झाल्यावर हैदराबादहून टीचर्स डिप्लोमा मिळवला. नंतर मुंबईला येऊन त्यांनी 'Comparative Literature with a focus on women’s literature' हा विषय घेऊन पीएच.डी. केली. या १९८४पासून पुणे विद्यापीठात वाङ्मय आणि वाङ्मयीन अभ्यास हा विषय शिकवतात.

महाजन या विविध परदेशी वाङ्मयाचे मराठी अनुवाद या विषयाला वाहिलेल्या एका त्रैमासिकाच्या-केल्याने भाषांतरच्या- सहसंपादक आहेत. त्यांनी आजवर या त्रैमासिकातून आणि अन्य नियतकालिकांतून गोळा केलेल्या गद्य-पद्यांच्या, कादंबऱ्यांच्या आणि आत्मचरित्रांच्या उताऱ्यांचे मराठी अनुवाद केले आहेत. महाजन या सध्या मराठी-जर्मन-रशियन या तिहेरी शब्दकोशाची निर्मिती करीत आहेत.

पुस्तके संपादन

  • आकाश पाताळ : थोमास मेले या जर्मन लेखकाच्या आयुष्यातल्या कठीण कालखंडावरचे पुस्तक. (अनुवादित) (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • Elfriede Jelinekच्या ' Die Liebhaberinnen' या कादंबरीचा मराठी अनुवाद (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, इ.स. २०१२)
  • कथांतर समकालीन जागतिक कथा : आधीच्या पन्नास वर्षात प्रकाशित झालेल्या विविध परकीय भाषांतील कथांचा संग्रह (सहसंपादक - अनघा भट). (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
  • खिडक्या (अनुवादित नाटक, मूळ जर्मन लेखक क्लेमेन्स म्येड्गे) (सहलेखक विद्यासागर महाजन) (काॅन्टिनेन्टल प्रकाशन)... मराठी लेखिका सानिया यांचा याच नावाचा एक कथासंग्रह आहे). हे सुद्धा पहा : 'खिडक्या अर्ध्या उघड्या' लेखक गणेश मतकरी
  • Gottfried von Kellerच्या तीन लघुकादंबऱ्यांचा मराठी अनुवाद (भविष्यविधा ई-बुक्स प्रकाशन २०१६)
  • Judith Hermannच्या 'Sommerhaus, später' या कादंबरीचा मराठी अनुवाद (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, इ.स. २०१६)
  • सत्याग्रही विचारधारा (अनुवादित, मूळ जर्मन लेखिका Ruth Klüger)
  • होलोकाॅस्टच्या कविता (अनुवादित), (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २००६), वगैरे वगैरे.

संदर्भ संपादन

वेबपेज