लेफ्टेनंट जनरल सर हॅरी जॉर्ज वेकलिन स्मिथ (जून २८, इ.स. १७८७:व्हिट्लेसी, इंग्लंड - ऑक्टोबर १२, इ.स. १८६०) हा इंग्लिश सेनापती होता.

सर हॅरी स्मिथ

अमेरिका, युरोप, आफ्रिका संपादन

वयाच्या १८व्या वर्षी हॅरी स्मिथने लष्करात नोकरी पत्करली. त्याला लगेच दक्षिण अमेरिकेला पाठवण्यात आले. त्यानंतर त्याने इ.स. १८०८ ते इ.स. १८१४च्या तुलुच्या लढाई पर्यंत अनेक लढायांत भाग घेतला. यानंतर स्मिथ अमेरिकेत गेला व ब्लाडेन्सबर्गच्या लढाईत लढला. त्यानंतरच्या वॉटरलूच्या लढाईतही तो होता. इ.स. १८२८ मध्ये त्याला केप ऑफ गुड होपला जाण्याचा हुकुम मिळाला. तेथे त्याने इ.स. १९३४ ते इ.स. १९३६ पर्यंत काफिर युद्धात भाग घेतला. त्याची कामगिरी पाहून त्याला क्वीन एडिलेड प्रांताचा राज्यपाल करण्यात आले. या काळात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रहिवाश्यांना 'सुसंस्कृत' करण्याचा प्रयत्न चालवला. परंतु यामुळे त्याला हे रहिवासी व स्थानिक डच जनतेचा रोष सहन करावा लागला. त्याला आफ्रिकेतून भारतात जाण्याचा हुकुम मिळाला.

भारत संपादन

भारतात येण्यापूर्वी स्मिथला डेप्युटी ऍड्जुटंट जनरलचा हुद्दा दिल्या गेला. त्याने भारतात ग्वाल्हेरच्या लढाईत व शिखांविरूद्धच्या लढाईत भाग घेतला व नाइट कमांडर ऑफ ब्रिटीश एम्पायरचा खिताब मिळविला. त्या नंतर स्मिथ सर ह्यु गोच्या हाताखाली मडकी आणि फिरुझशाहला लढला. यातील कामगिरीच्या जोरावर त्याला स्वतःचे सैन्य देण्यात आले. जानेवारी २८, इ.स. १८४६ रोजी त्याने अलिवालच्या लढाईत सतलजच्या किनाऱ्यावर शिख सैन्याचा पूर्ण पराभव केला. येथे न थांबता फेब्रुवारी १०ला त्याने सोब्राओनच्या लढाईतही पराक्रम गाजविला.

परत आफ्रिका संपादन

इ.स. १८४७मध्ये स्मिथ परत दक्षिण आफ्रिकेला केप कॉलोनीचा राज्यपाल व राजदूत म्हणून परतला. येथे त्याने बोअर युद्धात भाग घेतला. इ.स. १९५२मध्ये वरिष्ठ सेनापतींच्या नकळत त्याला ईंग्लंडला परत बोलावले गेले. तेथे त्याने दक्षिण आफ्रिकेतील राजवटीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न चालवले.