सरासरीचा गणितातील अर्थ एखाद्या माहितीसंचाचा मध्य अथवा अपेक्षित मध्य असा आहे. अंकगणितातील सरासरी ही सरासरी काढायची सर्वात सरळ पद्धत आहे. परंतु गणिताच्या इतर शाखांमध्ये सरासरीची व्याख्या अजून व्यापक केली गेली आहे.