जवळपास सर्व भाषेमधील विकिपीडियामध्ये असा संकेत आहे कि लेखांमध्ये {{PAGENAME}} व {{लेखनाव}} हा "जादुई शब्द" टाळावा.

मराठी विकिपीडियामधील भरपूर लेखांमध्ये "PAGENAME" व "लेखनाव" वापरण्यात आला आहे. जादुई शब्द असल्यामुळे "विशेष:येथे काय जोडले आहे" मार्फत ह्या शब्दाचा वापर करणारी पाने शोधता येत नाहीत.

वरील कारणांमुळे जर KiranBOT II ला एखाद्या लेखात PAGENAME किंवा "लेखनाव" हा जादुई शब्द आढळला तर तो त्याचे लेखाच्या मूळ नावात रूपांतर करतो.