श्रीकृष्ण राऊत

एक मराठी गझलकार

डॉ.श्रीकृष्ण राऊत (जन्म : पातूर(अकोला जिल्हा), महाराष्ट्र, १ जुलै १९५५) हे एक मराठी गझलकार आहेत. ते एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य) असून अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग-प्रमुख आहेत.

श्रीकृष्ण राऊत

कविता लेखनगझल लेखन संपादन

इ.स. १९७६ पासून श्रीकृष्ण राऊत हे कविता आणि गझले करीत आहेत. त्यांचा ‘गुलाल’ हा पहिला गझल संग्रह १९८९ साली प्रकाशित केला. त्यांच्या कवितांचा अमरावती विद्यापीठाच्या आणि नागपूर विद्यापीठाच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांनी ‘राघूमैना’ या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.केले आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या गझला आशा भोसले, उत्तरा केळकर, उषा मंगेशकर, दिनेश अर्जुना, भीमराव पांचाळे, मदन काजळे, रफीक शेख, सुधाकर कदम, सुरेश वाडकर, या नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्याआहेत.साचा:संदर्भ द्या

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची प्रकाशित पुस्तके संपादन

  • एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला (कवितासंग्रह-२००१)
  • गुलाल (गझल संग्रह).
  • गुलाल आणि इतर गझला (२००३)
  • चार ओळी तुझ्यासाठी (मुक्तक संग्रह-२००३)
  • चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित (२००७).
  • कारुण्य माणसाला संतत्त्व दान देते (गझलसंग्रह)

श्रीकृष्ण राऊत यांच्या ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ या कवितासंग्रहाला मिळालेले पुरस्कार संपादन

अन्य सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • डॉ. श्रीकृष्ण राऊत यांना ९ जानेवारी २०११ला अमरावती येथे झालेल्या गझलोत्सवात त्याच्या मौलिक मराठी गझल लेखनाकरिता मुंबईच्या बांधण जन प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
  • कुसुमाग्रज, ना.घ.देशपांडे, पु.ल.देशपांडे, मंगेश पाडगावकर ह्या साहित्यिकांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.
  • नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय

मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे.

  • ‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?’ हा त्यांचा गाजलेला लेखाचा ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत संदर्भ नमुद केला गेला आहे.
  • ‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या इंटरनेटवरील ब्लॉगची तेरा हजाराहून अधिक पृष्ठे आहेत.
  • त्यांनी ‘गझलकार’ब्लॉगवर सुरेश भट विशेषांक आणि सुधाकर कदम विशेषांक संपादित केले आहेत.

संकेतस्थळे संपादन