शोभना समर्थ

मराठी चित्रपट अभिनेत्री

शोभना समर्थ, पूर्वाश्रमीचे नाव सरोज शिलोत्री (इ.स. १९१५ - ९ फेब्रुवारी, इ.स. २०००) या मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री होत्या. भारतातील बोलपटांच्या आरंभीच्या काळात कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या शोभनाबाईंनी इ.स. १९३५ साली पडद्यावर झळकलेल्या विलासी ईश्वर या मराठी चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९४३ सालच्या रामराज्य या चित्रपटात त्यांनी साकारलेली सीतेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. इ.स. १९३० ते इ.स. १९६० च्या दशकाच्या अखेरपर्यंतच्या सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला. उत्तरकाळी त्यांनी आपल्या दोन मुलींच्या - नूतनतनुजा यांच्या - पदार्पणाच्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले.

शोभना समर्थ
शोभना समर्थ
जन्म इ.स. १९१५
मृत्यू ९ फेब्रुवारी, इ.स. २०००
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
पती कुमारसेन समर्थ
अपत्ये नूतन,
तनुजा

बाह्य दुवे संपादन