शिवाजी लक्ष्मण कांबळे


शिवाजी लक्ष्मण कांबळे (जुलै १२, इ.स. १९७१ -हयात) हे दैनिक एकमत (लातूर) वृत्तपत्राचे मुख्य उपसंपादक, पत्रकार, स्तंभलेखक, मुख्य संपादक आणि पुरोगामी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.[१]

शिवाजी लक्ष्मण कांबळे
जन्म जुलै १२, इ.स. १९७१
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण मानववंशशास्त्रात पदवी
पेशा पत्रकारिता
मूळ गाव भोगाव (धानोरा) ता. वसमत जि. हिंगोली
पदवी हुद्दा मुख्य उपसंपादक
अपत्ये अनार्य आणि कादंबरी
वडील लक्ष्मणराव
आई सुशिलाबाई
पुरस्कार उत्कृष्ट वार्तालेख (सा. महाराष्ट्र, औरंगाबाद), उत्कृष्ट पत्रकारीता (शिक्षक भारती, नांदेड), काव्यश्री (फ्रेंड सर्कल, पुणे), जिल्हा युवा पुरस्कार (नेहरु युवा केंद्र, उस्मानाबाद)

थोडक्यात परिचय संपादन

हिगोली जिल्ह्यातील मूळ गाव भोगाव ( धानोरा ) येथे दलित कुटुंबात जन्म. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य. प्रसार माध्यमांतून सामाजिक विषयांची मांडणी {अ‍ॅडव्होकसी} करून सरकारचे लक्ष वेधण्याचे ‘संपर्क, मीडिया नेटवर्क नामक संस्थेच्या माध्यमातून कार्य. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्यिक विषयावर विपुल स्फुटलेखन.

शिक्षण संपादन

प्राथमिक शिक्षण भोगाव (धानोरा) जि. हिगोली येथे, तर माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथे झाले. मानववंशशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकुल आर्थिक परिस्थिती असल्याने,ऑईल मिलमध्ये कामगार, इमारत बांधकामावर काम केले. शिवाय अन्य मजुरीची कामे करीत शिक्षण घेतले.

कारकीर्द संपादन

शिक्षण सुरू असताना आणि त्यानंतर छात्रभारती, राष्ट्र सेवा दल या सामाजिक संघटनामध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बरीच वर्षे सामाजिक कार्य केले. नळदुर्ग येथील अनाथ मुलांच्या आपलं घर प्रकल्पात वर्षभर कार्य केले. १९९२ मध्ये उस्मानाबादच्या दै. संघर्षमधून पत्रकारितेला प्रारंभ केला.दरम्यानच्या काळात दै. लोकमतमध्ये ग्रामीण वार्ताहर, उपसंपादक म्हणून पाच वर्षे काम केले. २००४ मध्ये नांदेडला दै. पुण्यनगरीचे उपसंपादक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात 'संपर्क मीडिया नेटवर्कचे' जिल्हाप्रतिनिधी म्हणून दोन वर्षे काम केले. २ जुलै इ.स. २०१२ पासून लातूरच्या दैनिक एकमतमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत.

पत्रकारिता संपादन

बातमीदार, दैनिक लोकमत, येरमाळा (१९९२-९४), उपसंपादक, दैनिक लोकमत, उस्मानाबाद (१९९४-९८). प्रासंगिक कलावंत, आकाशवाणी उस्मानाबाद केंद्र (१९९६). जिल्हा प्रतिनिधी, सा. महाराष्ट्र, काल-आज-उद्या, उस्मानाबाद (२००१-०२). उपसंपादक, दैनिक पुण्यनगरी, नांदेड (जाने.२००४-०८). जिल्हा प्रतिनिधी, दैनिक सुराज्य सोलापूर, नांदेड (२००९-१०). मुख्य उपसंपादक, दै. देशोन्नती, अकोला (२०११). मुख्य उपसंपादक, दैनिक एकमत, लातूर (जून-२०१२ पासून)

संदर्भ संपादन

  1. ^ नेटसंपर्क संस्थेचे वेब साईट Archived 2013-05-03 at the Wayback Machine. दिनांक २५ मार्च २०१३ रोजी सायं ५ वाजता जसे पाहिले