भौतिकशास्त्रानुसार वेग (इंग्लिश: Velocity, व्हेलॉसिटी) म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेतील चाल होय. चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते; तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे वेग ही राशी सदिश ठरते.

उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते. एवढ्या विशिष्ट कालावधीत स्थानांतर करणाऱ्या एखाद्या वस्तूचा सरासरी वेग v खालील सूत्रात मांडला जातो:

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत