"धन्य तुकोबा समर्थ (एकपात्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''धन्य तुकोबा समर्थ''' हे नामदेव तळपे यांनी लिहिलेलीक एकपात्रीसंग...
(काही फरक नाही)

००:५४, २ जून २०१२ ची आवृत्ती

धन्य तुकोबा समर्थ हे नामदेव तळपे यांनी लिहिलेलीक एकपात्रीसंगीत नाटक आहे. हे नाटक तळपे स्वत:च सादर करतात. नाटकात "नाम घेता...', "पंढरीची वारी आहे माझे घरी...', "आपुला तो एक देव करुणी घाव...', "वृक्षवल्ली आम्हा...', "आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने...' "आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी...' या अभंगांमधून संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सादर केले जातात. त्यांत तुकोबांचा जन्म, बालपण, देहू परिसर आणि इंद्रायणीचे माहात्म्य, तुकाराम महाराजांवर आलेली संकटे आणि त्यावर मात करण्यासाठी त्यांनी केलेले चिंतन, रचलेले अभंग, गाथा यांसह वैकुंठगमनापर्यंचा आढावा अभंगांतून घेतला जातो. "आम्ही जातो आमुच्या गावा...' या अभंगाने नाटकाचा शेवट होतो.

साधारणपणे दरवर्षी तुकाराम बीजेला नामदेव तळपे कुठे ना कुठे आपले एकपात्री नाटक सादर करत असतात. इ.स. २०१०मधील तुकाराम बीजेच्या दिवशी तळपे यांनी त्यांच्या एकपात्रीचा ५०वा प्रयोग सादर केला होता.