"देवीप्रसाद खरवंडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला ...
(काही फरक नाही)

२०:५५, २१ मे २०१२ ची आवृत्ती

काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला झाला.हे एक संस्कृत साहित्यिक आहेत. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असते. नाशिक मुक्त विद्यापीठाचे ’ज्ञानगंगा घरोघरी’ हे बोधवाक्य खरवंडीकरांनीच सुचवले होते.

शिक्षण आणि कारकीर्द

  • शालान्त परीक्षेपासून ते एम.ए.च्या परीक्षेपर्यंत सर्वत्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण
  • संगीतामध्ये पदविका
  • संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
  • गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक
  • २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
  • २५ ग्रंथांचे संपादन
  • अनेक शोधनिबंधाचे लिखाण
  • दोनशेहून अधिक संस्कृत कविता
  • दीडशेहून अधिक संपादकीय लेख
  • पाच संस्कृत एकांकिकांचे लेखन
  • पन्‍नासहून अधिक पीएच.डी.च्या प्रबंधाचे परीक्षक
  • महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षा मंडळाचे सदस्य
  • पुणे आणि अन्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळांवर सदस्यत्व
  • राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
  • आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
  • ’वाइज अदरवाइज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाचे संस्कृत अनुवादपुस्तकाचे मुख्य संपादक