"सखा कवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''सखा कवी''' हे रामदासी परंपरेतल्या जनार्दनस्वामींचे शिष्य होते. स...
(काही फरक नाही)

१५:२३, २८ मार्च २०१२ ची आवृत्ती

सखा कवी हे रामदासी परंपरेतल्या जनार्दनस्वामींचे शिष्य होते. समर्थवाग्मंदिरातील ५८१ क्रमांकाचे जवळजवळ संपूर्ण बाड या कवीचे आहे. सखा कवींनी लिहिलेले अभंग आणि त्यांनी लिहिलेली काही प्रकरणे त्या बाडात सापडतात.

सखा कवीच्या अन्य रचना :

  • आत्मादर्शप्रकाश किंवा ज्ञानदीपिका प्रकरण(अपूर्ण) : या प्रकरणातल्या ७९ ते १०४ एवढ्याच क्रमांकाच्या ओव्या सापडल्या आहेत.
  • एकनाथांची आरती.
  • द्रौपदीचा धावा, पाळणा आणि काही अन्य पदे.
  • भृगु-पराशर-संवाद नावाचे एक ७८ ओव्यांचे अपूर्ण प्रकरण
  • शनिप्रदोष : ८५ ओव्या.


दुसरे सखा कवी हे रामदासी संप्रदायातलेच, परंतु बाळनाथांचे शिष्य. चाफळखोऱ्यात अनेक गुरू केलेले बाळनाथ नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे दया, मैना,सखा कवी व अन्य बरेच शिष्य होते. या बाळनाथांचे शिष्य असलेल्या सखा कवींची काही पदे समर्थवाग्मंदिरात सापडली आहेत.