"सखाराम महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
इसवी सनाच्या १८५९अगोदर होऊन गेलेले श्री सखाराम महाराज ऊर्फ सखारामबाबा हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार आणि रामदासी कवी होते. समर्थवाग्देवता मंदिरातील बाड क्रमांक २०४मध्ये सखारामबाबाविरचित पंचीकरणाची वही आहे. त्या वहीत, सखाराम महाराजांनी पंचीकरण सुलभ करून सांगितले आहे. त्यांनी काही पदेही रचलेली आहेत.
सखाराम महाराज हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार होते.त्यांनी पंचीकरण व रामगीता यावर भाष्य लिहिले आहे.
 
सखाराम महाराजांची डोमगाव परंपरा अशी आहे :
* रामदास स्वामी--> कल्याणस्वामी--> मुधावा--> भिवाजी--> महारुद्र--> हनुमंत--> सखाराम महाराज. (आधार : श्रीरामदासी संशोधन खंड पहिला, पृष्ठ १०७).
 
यांशिवाय, रामदासस्वामींच्या शिष्यपरंपरेत [[सखा कवी| सखा]] नावाचे आणखी दोन कवी होऊन गेले, एक बाळनाथांचा शिष्य आणि दुसरा जनार्दनशिष्य. रामदासी नसलेले सखा नावाचे आणखीही कवी होऊन गेले, ते असे :
* अभंगात्मक रामगीता लिहिणारे कवी सखाराम.
*"आम्ही राजहौंस पक्षी । सहज आलो मुंबई शहरासी" लिहिणारा लावणीकार सखाराम.
* चाफळखोऱ्यातील बाळनाथ नावाच्या साधुपुरुषाचा सखा नावाचा शिष्य.
* वामनपंडितांच्या नावावर असलेल्या मराठी समश्लोकी [[गंगालहरी]]चा खरा कवी-सखा कवी.
* वेदान्तपर लावण्या लिहिणारे सखा कविराय.
* सखानंद नावाचा पदे लिहिणारा एक कवी.
* सखाराम जगजीवन नावाचा गंगालहरीची समश्लोकी लिहिणारा तिसरा कवी.
* सखारामतनय(सखारामसुत) नावाचा कवी. याने आर्याबद्ध रुक्मिणी स्वयंवर लिहिले आहे.
* सखाराम त्र्यंबक ऊर्फ नाना गर्दे नावाचे चरित्रकार. यांनी चिदंबरस्वामींचे पद्यमय चरित्र आणि इतरही काही काव्ये लिहिली आहेत.
 
 
{{वर्ग}}