"वसंत सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''वसंत सोमण''' हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्...
(काही फरक नाही)

२३:३३, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती

वसंत सोमण हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल्या. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. २ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे अकाली व आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर, वगैरे मित्रमंडळींनी एकत्र येऊन वसंत सोमण मित्रमंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे दरवर्षी झगमगाटापासून दूर राहून महत्त्वाचे काम करणाऱ्या रंगकर्मींना 'वसंत सोमण पुरस्कार' देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. हा पुरस्कार दरवर्षी २ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपासच्या सोईस्कर दिवशी दिला जातो. इ. स.१९९७पासून सुरुवात झालेल्या या पुरस्कारांनी आत्तापर्यंत(२०११) गौरवलेल्या कलावंतांची नावे :

१९९७  : विजय केंकरे १९९८  : राजीव विजय शिर्के १९९९  : संभाजी भगत २०००  : कांचन सोनटक्के २००१  : निखिल रत्नपारखी २००२  : संदेश कुलकर्णी २००३ : चेतन दातार २००४ : विद्या पटवर्धन २००५ : उदय पंडित २००६ :विजयकुमार नाईक २००७ : राजकुमार तांगडे २००८ : रसिका जोशी २००९ : अरुण होर्णेकर २०१० : चंदाताई तिवाडी २०११ : अप्पासाहेब धाडी