"अहिराणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चौथे अखिल भारतीय '''अहिराणी साहित्य संमेलन''' नाशिकला तीन आणि चार ड...
(काही फरक नाही)

०१:११, १६ मार्च २०१२ ची आवृत्ती

चौथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन नाशिकला तीन आणि चार डिसेंबर २०११ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ . शकुंतला चव्हाण होत्या. संमेलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माणिकराव गावित, सुरूपसिंह नाईक, एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावित अशी राजकारणी मंडळी आली होती.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथयात्रा व सांस्कृतिक दिंडी झाल्यावर संमेलनाचे उद्‌घाटन अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष , उद्‌घाटक , प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणानंतर दुपारी 'अहिराणी बोली व साहित्य मीमांसा' या विषयावर परिसंवाद झाला. सायंकाळी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री खानदेशी ठेचा हा विविधकलागुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊन संमेलनाचा पहिला दिवस संपला.

संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ . यू . म . पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मु.ब.शहा हजर होते.

त्या पूर्वीची अहिराणी साहित्यसंमेलने :