"मधुवंती दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==कारकीर्द==
मराठी संगीत नाटकांमध्ये काम करीत असताना मधुवंती दांडेकर यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक
उर्दू भाषिकांना त्यांची मातृभाषा उर्दूच वाटली. भूमिकेत स्वत:ला झोकून देण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची तयारी व त्यासाठीचा अट्टाहास येथे दिसतो. विद्याधर गोखले यांच्या 'गझलांचा गुलशन' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यासाठी तर त्या प्रसिद्ध गझल-गायक श्री. विजय चौहान यांच्याकडे गझलही शिकल्या.
 
मधुवंती दांडेकर यांना एकदा गुजराथी नाटकात भूमिकेसाठी विनंती करण्यात आली होती. ते नाटक म्हणजे मराठी सुवर्णतुलाचे गुजराथी रूपांतर होते. नाटकाच्या निर्मात्याला रुक्मिणीसाठी सुयोग्य गुजराथी अभिनेत्री मिळत नव्हती. मधुवंती दांडेकरांनी सर्व संवाद मराठी देवनागरीत लिहून घेतले, पाठ केले आणि गुजराथीचा गंधही नसताना रुक्मिणीची ती भूमिका चांगल्या रीतीने वठवली.
 
बालगंधर्व हे मधुवंती दांडेकरांचे संगीतातले आदर्श. तसा त्यांना अध्यात्मातही रस आहे. त्यासाठी विमला ठकार यांना त्या गुरू मानतात. विमला ठकारांच्या अनेक पुस्तकांना मधुवंती दांडेकरांनी हिंदी-मराठी प्रस्तावना लिहून दिल्या आहेत. त्यांच्या काही हिंदी पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले आहे.
 
 
==मधुवंती दांडेकरांनी भूमिका केलेली नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका==
 
{| class="wikitable "