"श्यामला माजगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''शामला माजगांवकर''' या मराठीतील एक नामवंत शास्त्रीय संगीत गाणार्...
(काही फरक नाही)

१२:३२, १९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

शामला माजगांवकर या मराठीतील एक नामवंत शास्त्रीय संगीत गाणार्‍या गायिका होत्या. या दुसर्‍या एक प्रसिद्ध गायिका हिराबाई जव्हेरी यांच्या भगिनी होत्या. या दोघींनी मिळून मुंबईत इ.स.१९२९ साली दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘स्वामी समर्थ संगीत विद्यालया‘ची स्थापना केली. स्त्रियांनी स्त्रियांसाठी व लहान मुलांसाठी मुंबईत काढण्यात आलेले हे पहिलेच संगीत विद्यालय होते. मुंबईत या विद्यालयाच्या खार, चर्नीरोड, आणि दादर(हिंदू कॉलनी) येथे शाखा होत्या. लीला चिटणीस, नलिनी जयवंत, जयश्री वणकुद्रे(व्ही.शांताराम यांच्या पत्नी), मोहनतारा तळपदे-अजिंक्य अशा कितीतरी बायका या विद्यालयात शिकून मोठ्या झाल्या. हिराबाई जव्हेरी या स्वत: सतार, बाजाची पेटी आणि तबलासुद्धा उत्तम वाजवीत आणि शिकवीतही. प्रसिद्ध गायिका मधुबाला जव्हेरी-चावला ह्या हिराबाईंच्या कन्या.

शामला माजगांवकर यांची ध्वनिमुद्रित होऊन गाजलेली गाणी

  • कन्हय्या बजाव बजाव मुरली (गोविंदाग्रज यांच्या प्रसिद्ध कवितेतल्या ४२ कडव्यांपैकी काही)
  • तुज मिळेल गं मिळेल सारी साथ (शांताबाई जोशी यांची कविता)