"बालगंधर्व रंगमंदिर (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बालगंधर्व रंगमंदिर''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे]] शहरातील अग्रगण्य नाट्यगृह आहे. हे पुण्यातील जंगली महाराज रोडवर आहे. याचे उद्‌घाटन २६जून १९६८रोजी झाले. याची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था पुणे महापालिका पाहते.नाट्यगृहाचे सभागृह बंदिस्त असून वातानुकूलित आहे.नाट्यगृहाच्या आवारात कलाकारांच्या निवासाची सोय आहे.
रंगमंच ३०’ x ४४’ x २२’ या आकाराचा असून मंचासमोर मोठा दर्शनी पडदा आहे. प्रेक्षागृहाची क्षमता तळमजल्यावर ६६९ आसने व सज्ज्यात ३२० आसने इतकी आहे. नाट्यगृहाला लागून वरच्या मजल्यावर एक मोठे कलादालनही आहे, तेथे नित्यनियमाने पुस्तकांची, चित्रांची व अन्य कलावस्तूंची प्रदर्शने भरत असतात. नाट्यगृहाचे आवार बरेच मोठे असून तिथे थोडीफार बाग केलीआहे. आवारात रिकामी जागाही भरपूर असून तिथे मौसमी वस्तूंच्या विक्रीची दुकाने भरवली जातात.
 
{{विस्तार}}