"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
J (चर्चा)यांची आवृत्ती 804814 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
}}
 
'''नाशिक''' ({{audio|Nashik.ogg|pronunciation}}) अथवा ''नासिक'' [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर [[उत्तर महाराष्ट्र]], [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध [[तीर्थक्षेत्र]] आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामूळेत्यामुळे 'भारताची [[नापा व्हॅली]]' (Napa Valley) म्हणून आता शहर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे.
 
नाशिक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. सीमेंससीमेन्स, महिंद्र अँड महिंद्र, मायको, व्ही.आय.पी., क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो, ABB, सॅमसोनाइट, सिएट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांसारखे अनेक मोठे कारखाने नाशिकपरिसरातनाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे [[नोटांचा छापखाना]] (इंडियन करन्सी प्रेस) तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे. हा [[बस|बससेवेने]] जोडलेला आहे.
 
==इतिहास==
पुर्वकालापासूनपुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. "[[जनस्थान]], [[त्रिकंटक]], [[गुलशनाबाद]], आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्षमणलक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असतांना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत मध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नसिकचा डोंगर ही सह्याद्रीची नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.
 
चार कुंभमेळ्यांपैकी [[सिंहस्थ कुंभमेळा|सिंहस्थ कुंभमेळ्याचे]] क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे [[कुंभमेळा]] भरतो. येथील मंदिरे व [[गोदावरी नदी|गोदावरी नदीवरील]] घाट प्रसिंद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली [[पांडवलेणी]] आहेत. पेशवे घराण्यातील [[आनंदीबाई पेशवे]] येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले