"आंदोलने आणि चौक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==प्लास डी ला बॅस्टाइल चौक (पॅरिस-फ्रान्स)==
 
परिसमधल्या या चौकाचे नाव पहिल्यांदा १४ जुलै १७६९ ला तिथे झालेल्या निदर्शनांमुळे प्रसिद्धीस आले. फ्रान्सच्या क्रांतीची सुरुवात याच चौकातून झाली. या चौकात तेव्हा असलेल्या एका किल्ल्यावरील बॅस्टाइलच्या तुरुंगावर आंदोलनकर्त्यांनी ताबा मिळवला आणि फ्रान्सच्या राजेशाहीविरुद्ध क्रांतीचा बिगुल फुंकला. या धामधुमीत किल्ला उद्ध्वस्त झाला. पण त्यानंतर याच चौकातून परत क्रांतीचे नारे उमटले आणि शेवटी १८३० साली फ्रान्सचा अधिपती दहावा चार्ल्स याला आपली गादी सोडावी लागली.
 
हा चौक पॅरिसच्या महानगरातील ४, ११ आणि १२ क्रमांकांच्या प्रभागांनी(वॉर्ड्‌जनी) वेढला गेला आहे. हा चौक आणि याच्या परिसराला अनेकदा नुसते '''बॅस्टाइल जुलै कॉलम''' असे म्हणतात. हा कॉलम डी ज्युलियेट-जुलै कोलम(स्तंभ) १८३०च्या क्रांतीचे स्मृतिचिन्ह आहे. इथल्या आणखी लक्षवेधी इमारतींमध्ये बॅस्टाइल नृत्यनाट्यगृह, बॅस्टाइल भूमिगत रेल्वे स्टेशन आणि सेंट मार्टिन कॅनॉलचा थोडा भाग येतो. जुने बॅस्टाइल रेल्वे स्टेशन १९८४ सालापर्यंत, आता जेथे नाट्यगृह आहे त्या जागेवर होते.
 
या चौकात अनेक कार्यक्रम होतात. रात्रीच्या वेळी, बॅस्टाइलचा ईशान्य कोपरा तेथे असलेल्या कॉफीगृहे, मद्यालये, नाइट क्लब्ज आणि समारंभ-दालनांनी गजबजलेला असतो. तरीही या प्लास डी ला बॅस्टाइल चौकाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे अजूनही राजकीय स्वरूपाची निदर्शने होतात. २८ मार्च २००६ रोजी झालेली विशाल अ‍ॅन्टी सीपीई निदर्शने याच चौकात झाली होती.
 
==डिसेंब्रिस्ट्स चौक (सेंट पीटसबर्ग-रशिया)==