"दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
काही दिवसांतच दारासिंग सिंगापूरमधील भारतीय कुस्तीगीरांच्या दोन गटांचा सभासद झाले. त्यांच्या पहिल्या जाहीर कुस्तीत दारासिंग यांनी एका चिनी पहिलवानाला चितपट केले. या कुस्तीने दाराला प्रसिद्धी आणि पैसे मिळाले. आता खुराकाच्या खर्चाची सोय झाली होती. आणखी एकदोन कुस्त्या जिंकल्यावर दारासिंग यांनी पहारेकर्‍याची नोकरी सोडून दिली आणि कुस्तीवर संपूर्ण ध्यान द्यायला सुरुवात केली. काही वर्षांनी दारासिंग सिंगापूरवरून इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे गेले आणि तिथल्या पहिलवानांना हरवून भारतात (मुंबईत) आले. त्या वेळी मुंबईत युरोपीय कुस्तीगीर किंगकाँगचा बोलबाला होता. किंगकाँग आपल्या पाशवी शक्तीसाठी आणि उद्धटपणासाठी कुप्रसिद्ध होता. दारासिंगांनी मुंबईत त्याच्याशी जबरदस्त कुस्ती खेळून त्याचा पाडाव केला. किंगकाँगला हा अपमान जिव्हारी लागला आणि तो सिंगापूरला कायमसाठी निघून गेला. त्यानंतर दारासिंग युरोपात गेले भरपूर कुस्त्या खेळले आणि तिथेही त्यांनी कुस्तीत एकदाही न हरण्याचा विक्रम केला. शेवटीशेवटी इ.स. १९५९ मध्ये कॅनडाला जाऊन तिथे कुस्त्या मारून दारासिंग यांनी राष्ट्रकुलासाठी ठेवलेली ट्रॉफी जिंकली आणि ते भारतात परत आले.
 
==चित्रपट- कारकीर्द==
 
दारासिंग रंधावांचे कुस्तीजीवन ऐन भरात असताना त्यांना १९६० सालच्या एका धमाकेदार लढतीनंतर दर्शन सभरवाल आणि रामकुमार नावाचे दोन चित्रपटनिर्माते भेटले आणि त्यांच्या चित्रपटांत भूमिका करावी असा प्रस्ताव दारासिंगांसमोर ठेवला. दारासिंगाच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्याचा निर्मात्यांचा हेतू स्पष्ट होता. पण दारासिंग बधले नाहीत. त्यांनी त्या वेळेपर्यंत फक्त दोन चित्रपट पाहिले होते, आणि त्यांना चित्रपटांचे अजिबात आकर्षण नव्हते. निर्माते पुन्हापुन्हा येत राहिले आणि दारांना गळ घालत राहिले. दारासंगांना जुन्या निवृत्त कुस्तीगीरांची हलाखीची परिस्थिती आठवली; त्यांच्यापैकी एक टांगा चालवून उदरनिर्वाह करीत होता. दारसिंगांनी विचार केला, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपटांत जायला काय करकत आहे? कोण जाणे पुढे कुणी नवा मल्ल येईल आणि आपली कारकीर्द संपवून टाकेल.
 
चाळीस कुस्त्यांचे चाळीस हजार मिळतात, तसेच चाळीस दिवसांच्या चित्रीकरणाचे चाळीस हजार मिळावेत या अपेक्षेने दारासिंग रंधावांनी महेश भटांचे वडील नानाभाई भट यांच्या दिग्दर्शनाखाली किंगकाँग या चित्रपटात काम केले. १९६२मध्ये हा चित्रपट बाहेर पडला. सामाजिक रडक्या चित्रपटांचा वैताग आलेल्या प्रेक्षकांनी किंगकाँग डोक्यावर घेतला. च्हाळीस हजार रुपयांचे पुढच्यापुढच्या तारखांचे धनादेश हाती पडले. त्यांपैकी फक्त पाच हजार रुपयांचे वटले आणि बाकीचे धनादेश बँकांनी धुडकावून लावले.पण प्रसिद्धी अमाप झाली. १९६२-६३ या दोन वर्षांत दारासिंगांचे सॅमसन्, हर्क्युलस, तूफान, आया तूफान, फिर आया तूफान, थीफ ऑफ बगदाद, आणि टारझन यांसारखे डझनभर चित्रपट प्रकाशित झाले किंवा त्यांचे चित्रीकरण सुरू झाले. कुस्तीमुळे दारासिंगांचा मेहनत करायचा आवाका(स्टॅमिना) जबरदस्त वाढला होता. त्यामुळे ते दिवसातून चित्रीकरणाच्या तीन पाळ्यात काम करत. या बाबतीत त्यांनी चित्रपट अभिनेता महमूदचे विक्रम मोडीत काढले. मजेशीर गोष्ट अशी की याच काळात दारासिंगांनी इराणी मल्ल रुस्तुम या नावावरून बेतलेल्या रुस्तुम, रुस्तुमे हिंद व रुस्तुमे रोम या तीन चित्रपटांत कामे केली.
 
==निवृत्तीनंतरचे आयुष्य==