"अँजेला सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कार्ल मार्क्सने ग्रंथबद्ध केलेले साम्यवादी तत्त्वज्ञान पुढे ले...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
अँजेला पुण्याजवळ लवासा रोड, पिरंगुट येथे सुषमा हेमंत रामटेके ऊर्फ श्रद्धा गुरव ऊर्फ भारती(वय २७)या तिच्या साहाय्यकाबरोबर २७ एप्रिल २०११ रोजी पकडली गेली. हे घर गोल्डन कॉरिडॉर कमिटीचे महाराष्ट्रातील मुख्यालय आहे. राज्याच्या माओवादी चळवळीच्या ’थिंक टॅंक’ची सभासद असलेली अँजेला, विद्यार्थी, सुशिक्षित तरुण, औद्योगिक वसाहतीत काम करणारे सामान्य कामगार आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब लोक यांच्यात माओवादाचा प्रसार करत होती. ती ’मोस्ट वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी आहे. तिच्यावर २७-४-२०११ पर्यंत, खुनाच्या गुन्ह्यासकट सुमारे २० गुन्ह्यांची नोंद होती. १ फेब्रुवारी २००९ ला ग्याराबत्ती आणि मरकेगांव येथे माओवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात एका पोलीस उपनिरीक्षकासह १४ पोलिसांचे बळी गेले होते. या गोळीबाराचा कट अँजेला हिनेच आखला होता असा आरोप तिच्यावर केला गेला होता.
 
अँजेला ही बी.एस्‌सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्‌एस्‌सी.(झुऑलॉजी), एम्‌ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी,फ्रेन्च यांसोबत गडचिरोली आणि गोंदियात सररास बोलल्या जाणार्‍या माडिया आणि गोंडी या भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात.
 
मूळची चंद्रपूरची असलेली अँजेला ही, माओवादी चळवळीत असलेल्या गुन्हेगारांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक मदत करणे त्यांची शस्त्रे लपवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळी उपकरणे खरेदी करणे वगैरे कामे करीत होती.