"सरोज देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: २०१० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या सरोज देशपांडे यां...
(काही फरक नाही)

१९:२२, २ मार्च २०११ ची आवृत्ती

२०१० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या सरोज देशपांडे यांनी पुणे विद्यापीठाच्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात शिक्षण घेतले. इतिहास, भूशास्त्र, पर्यावरण इत्यादी विषयांवरील पुस्तके, तसेच गिरीश कर्नाड यांची काही नाटके व काही अन्य सामाजिक विषयांवरील कादंबर्‍याही त्यांनी अनुवादित केल्या आहेत. ’झेन ऍन्ड द आर्ट ऑफ़ मोटारसायकल मेन्टेनन्स’ या जीवनविषक तत्त्वज्ञान सांगणार्‍या कादंबरीचा त्यांनी केलेला अनुवाद रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे.

२०१०चा पुरस्कार त्यांना ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी मिळाला. मूळ पुस्तक ’ए मॅटर ऑफ़ टाइम’ हे शशी देशपांडे यांनी लिहिले होते.