"जेम्स विल्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जेम्स विल्सन हे भारतावरच्या ब्रिटिश राजवटीच्या काळातले हिंदुस्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
१८५३ ते १८५८ विल्सन ब्रिटिश कोषागाराचा अर्थसचिव होता.
१८५८ मध्ये त्याने ’चार्टर्ड बॅंक ऑफ़ इंडिया, ऑस्ट्रेलिया ऍन्ड चायन” सुरू केली. १८५९ साली स्टेन्डर्ड बॅंक ऑफ़ ब्रिटिश साउथ आफ़्रिका या बॅंकेबरोबर विलीनीकरण होऊन आजची स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅंक उदयाला आली.
विल्सन बोर्ड ऑफ़ कंट्रोलचा सहसचिव असताना हिंदुस्थानविषयक घेतलेल्या अनेक आर्थिक निर्णयांत अप्रत्यक्ष सहभागी होता. लॉर्ड डलहौसी हिंदुस्थानात जे रेल्वेचे जाळे अंथरत होता त्या उपक्रमात विल्सनचा मोलाचा वाटा होता.
१८५९ च्या नोव्हेंबर महिन्यात विल्सन बोटीने कलकत्ता येथे दाखल झाला आणि अर्थमंत्री झाला. पहिला अर्थसंकल्प त्याने राजधानी कलकत्याच्या कायदेमंडळात १८ फेब्रुवारी १९६० ला सादर केला. पहिल्या अर्थसंकल्पात तीन महत्त्वाचे कर सुचवले होते. प्राप्‍तिकर, परवानाकर आणि तंबाखूवरचा कर. मद्रासचा लोकप्रिय गव्हर्नर सर चार्ल्स ट्रॅव्हेलियन याने या करांच्या सूचनेवर टीकेची झोड उठवून विल्सनला सळो की पळो केले होते. अखेर, अर्थसंकल्प २१ जुलै १८६० ला पास झाला.
 
२०१० साली, त्या ब्रिटिश हिंदुस्थानच्या पहिल्या अर्थसंकल्पाला आणि पर्यायाने प्राप्‍तिकराला दीडशे वर्षे पूर्ण झाली. १८६० मध्ये सुचवलेले प्राप्‍तिकराचे दर असे होते. : सामान्य करदात्याला रुपये २०० पर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त. २०० ते ५०० रुपयांपर्यंत २ टक्के प्राप्‍तिकर आणि ५०० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्‍न असणार्‍यांना ३ टक्के प्राप्‍तिकर अधिक एक टक्का सार्वजनिक कल्याणकर. नाविक अधिकार्‍यांचे २१०० रुपयांपर्यंतचे आणि पोलीस आणि सेनाधिकार्‍यांचे ४९८० रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त होते.
--अपूर्ण--